Cart

No products in the cart.

Dowsing (लोलकशास्त्र)

प्रत्येकाच्या जीवनात कधी कधी निर्णायक अशी परिस्थिती येते की, त्यासाठी आपल्याला महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो. “होय किंवा नाही’  काय “करावे’ काय “करु नये’ “To be or Not to be’.

कधी कधी अशा परिस्थितीत आपण एखाद्या अशा व्यक्तीकडे जातो, की ज्या व्यक्तीकडून आपल्याला योग्य तो निर्णय मिळेल.  काही व्यक्तींकडे असे कौशल्य असते की जे आपल्याला तटस्थपणे योग्य तो निणर्य देऊ  शकतात. पंरतु त्या व्यक्तीच्या निर्णयाबद्‌दल आपण् 100% विसंबून राहू शकत नाही.  अशा निर्णायक परिस्थितीत डाऊझिंग (लोलकशास्त्र) ही पध्दती आपल्याला खूप फायदेशीर ठरते. डाऊझिंगच्या आधारे आपल्याला प्रश्नांचे अचूक उत्तर कळू शकते.

लोलकशास्त्र हे अतिप्राचीन शास्त्र आहे.  लोलकशास्त्र ही विद्या नक्की केव्हापासून अस्तित्वात आली हे सांगणे कठीण आहे.  साधारण तीन ते चार हजार वर्षापूर्वीच ही विद्या विकसित झाली असावी.  मात्र या विद्येचा उगम निसर्गातूनच झालेला आहे हे निश्चित.

अनेक प्राण्यांमध्ये ही विद्या नैसर्गिकरित्याच असते.  एका विशिष्ठ वेळेस एका खंडातून दुस-या खंडात जाणारे पक्षी, बोट बुडण्या आधीच पळ काढणारे उंदीर. सर्व प्रकारच्या धोक्यांची आधीच जाणीव होणारे पशु, केवळ वासानेच अपेक्षित वस्तू शोधणारे श्वान तर अनेक प्राणी ज्या भूमित पाणी आहे तेथेच वास्तव्य करतात, तर काही प्राणी पाणी असलेली जागा वगळून वास्तव्य करतात.  म्हणजेच  लोलक विद्येची मूलतत्वे ही प्राण्यांमध्ये निसर्गतःच असतात हे सिध्द होते.  लोलक विद्या त्यांच्या शरीरात, त्यांच्या जीवनात समावलेली आहे असे दिसून येते.

काही व्यक्तींना निसर्गतःच लोलक विद्या प्राप्त झालेली दिसून येते.  विशेषतः  आपण ज्यांना पायाळू म्हणतो, अशा ब-याच व्यक्तींना ही नैसर्गिक देणगी असते.  अशा व्यक्ती भूगर्भात पाणी नक्की  कोणत्या ठिकाणी लागू शकेल? गुप्त धन कुठे आहे? हे सांगू शकतात.  अनेक व्यक्तींच्या बाबतीत विशेषतः तपस्वी त्यांच्या तबोबलाने अन्य कोणत्याही साधनांशिवाय भूत-भविष्यातील प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ  शकतात. काही अध्यात्मिक व्यक्तीस दैवी आशिर्वादाने अशी सिद्‌धी प्राप्त होते की क्षणार्धात एखादे दृश्य त्यांच्या समोर येते आणि त्याबद्‌दल ते भाकीत करु शकतात, ज्याला आपण अतिंद्रिय शक्ती म्हणतो.

बाहय जगताचे ज्ञान होण्यासाठी मानव त्वचा, कान, नाक, डोळे व जीभ या इंद्रियांचा उपयोग करतो या ज्ञानेद्रियांच्या कुवती पलीकडील एखादी गोष्ट ज्यावेळी मानवाला समजते, दिसते किंवा जाणवते तेव्हा त्या व्यक्तीजवळ अतिंद्रीय ज्ञानशक्ती आहे असे आपण समजतो.

अशी अतिंद्रीय शक्ती सर्व सामान्य व्यक्तींजवळ नसते.  परंतु लोलक विद्या शिकून, सरावाने विशिष्ठ प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आपण यशस्वी होऊ  शकतो. डाऊझिंग शिकण्यास अत्यंत सोपे आहे परंतु सराव महत्वाचा आहे.

डाऊझिंग ही विद्या मूळची भारतीय. पंरतु आज भारतापेक्षा परदेशातच जास्त प्रमाणात वापरली जाते.  अनेक डॉक्टर आपल्या प्रक्टीसमध्ये डाऊझिंगचा उपयोग करतात.

पूर्वीच्या काळात डाऊझिंगचा उपयोग भूगर्भातले पाणी शोधण्यासाठी केला जात होता.  मात्र पहिल्या  महायुध्दापासून  डाऊझिंंगचा उपयोग भूगर्भातले तेल आणि अन्य खनिज शोधण्यासाठी केला जाऊ  लागला.

अलीकडच्या काळात डाऊझिंग या विषयात खूप संशोधन झाले आहे, त्यामुळे डाऊझिंगचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो.  एखाद्या व्यक्तीच्या शरीरातल्या कुठल्या भागात कुठला रोग झाला आहे, रोगाचे मूळ कशात आहे, रोग्यास कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट द्यावी, कुठली औषधे उपयुक्त ठरतील याचा निर्णय करण्यात डाऊझिंगची मदत होते.

एखादी जागा चांगली आहे का वाईट, तिथला उर्जा स्त्रोत्र कसा आहे, जागा घ्यावी का न घ्यावी. एखादी व्यक्ती हरवलेली असल्यास ती जिवंत आहे की मृत आहे.  जिवंत असल्यास कुठे आहे याचाही शोध डाऊझिंगच्या आधारे घेता येतो.

एंकदरीत डाऊझिंगची कि”या ही अलौकिक असून तिच्याव्दारे भविष्यकालीन घटनांचा, पाण्याचा व खनिजांचा शोध घेता येतो पण त्यासाठी शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.  वास्तुरविराज मध्ये डाऊझिंग ही विद्या शिकविली जाते.

Recent Posts

Comments

 1. prasad janvekar

  plz send date of dousing work shop

  November 18, 2014 Reply
  • vasturaviraj

   contact our office @ 022 67847600/01/06 for further details.
   also do provide your contact details.

   February 09, 2015 Reply

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *