Cart

No products in the cart.

सुख म्हणजे काय?

आयुष्यांतील सुख दुःखची मजशी कां बाधा ।।

जीवन नामक यझातील या दोन्ही ही समिधा ।।

‘किंबहुना सोये । जीव आत्मयासि लाहे।

तेथे जे होये । तथा नाम सुख (ज्ञानदेव)

आत्यंतिेक  दुःखाची निवृती व निरतीशय सुखाची प्राप्ती हया करीता मनुष्याने आयुष्यभर झटायला हवे. परंतु श्रेयस सोडून प्रेयसाच्या (अभुदयाच्या) मागे तो लागतो. यच्चयावत जीवाला वाटत असते की, आपण सुखी व्हावे. त्या करीता आमची धडपड सुरू असते. किमान आठ ते सोळा तास काम करून जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल याच्या करीता आमचा प्रयत्न असतो. या सर्व धडपडी मागे एक समान सूत्र आहे ते म्हणजे सुखाची प्राप्ती. पण अनुभव काय आहे? तोंडाने “सुख सुख’ म्हणत आणि प्रत्यक्षांत मात्र दुःख भोगून आम्ही मरून जातो पण सुख काही पदरी पडत नाही. असे का व्हावे? आमचा मार्ग चुकला का? आमची दिशा चुकली का ? वेग कमी पडला काय? आमचे सर्वच चूकतच गेलेले आहे.

1) मुळात आम्हाला सुख म्हणजे काय? हेच कळलेले नाही. त्यामुळे आमची गत, जसा एखादा घरांतून रागावून प्रवासाला निघतो पण त्याचे गंत्तव्य स्थान मात्र निश्चित नसते; मग त्याची जी धडपड ती धडपडे पर्यंत चालली तरी त्याला काहीच उपयोग नसतो. अशी आमची सुखाची कल्पना आहे.

2) आमचा असा ठाम विश्वास आहे की पैसा असेल तर आम्ही सुखी होऊ . पण हा विचारच, विश्वासच आमच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. जर पैशानेच सुख विकत घेता आले असते तर सर्वच श्रीमंत सुखी असायला हवे असते. पण आहेेेेेत काय ते सुखी? अर्थात नाही! फार तर पैशाने आपण सोई निर्माण करू शकू, जीवन सुसहय करण्याचा प्रयत्न करू शकू. पण सुख प्राप्त करता येणार नाही. संपूर्ण घर ए.सी. करू, ऑफीस ए.सी., कार ए.सी. पण जर एम. एस. ई. बी. ची अवकृपा झाली तर सर्व सोडून बाहेर उन्हात येऊ न उभे राहण्या शिवाय गत्यंतर नसतेेे. सुख वेगळे, स्वास्थ वेगळे व सुखसोई वेेगळया असतात. चांगल्या आई-वडीलांच्या पोटी जन्म, गुणी मुलगा, सुविद्य पत्नि, चांगला मनमिळावू जावाई, आज्ञाधारक सून हे स्वास्थ या शब्दात मोडते. व त्याची प्राप्ती संचित प्रारब्धानुसार होत असते. म्हणजेच काय तर पुण्याईची कमाई आपल्याला स्वास्थ मिळवून देऊ  शकेल तर पैशाची कमाई सुखसोई निर्माण करून देऊ  शके ल. पण सुख …..?

3) तिसरा गैरसमज… अगदी कुणालाही विचारा मग तो गरिब असो, श्रीमंत असो, सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, शहरी भागातला असो वा ग्रामिण भागातला…. त्याला जर विचारले, “”का रे बाबा सुख कशात आहे?” तर तो उत्तर देेईल, “”मानन्यात” व खरे तर मान्यताच आमच्या दुःखाचे मुळ कारण आहे. जसे की “”मला ज्यांत सुख प्राप्त होईल असे वाटते, कदाचित दुसऱ्याला त्यापासून दुःख सुध्दा होऊ  शकेल! म्हणूनच सुख हे मानन्यात नसून प्रत्यक्ष प्राप्तीत आहे. मानन्यांत काय आहे…. तर ते समाधान. “”ठेविले अनंत तैसेचि रहावे । चित्ति असो द्यावे समाधान।।” (तुकोबा)

मग काय आमची वाट चुकली काय? वाट चुकली असेल दिशा चुकली असेल तर तर्क सांगेल, “”दिशा बदला”! पण आपण दिशा बदलून किती दिशा बदलणार? भूगोलाने आम्हाला केवळ दहाच दिशा शिकविल्या आहेत. जशा पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण, नैॠत्य-ईशान्य, वायव्य-अग्नेय व उर्ध्व-अध. हयाच त्या दहा दिशा पण दाही दिशा फिरून सुख मिळणार नाही. कारण जे क ाही आहे ते सर्व अकराव्या दिशेला आहे. ती म्हणजेच आंतर-दिशा वा आंतर-दशा! ही दिशा फक्त सद्‌गुरूच दाखवू शकतो. म्हणून खऱ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर “”सद्‌गुरूंना अनन्य शरण जाणे” हा एकमेव सुख प्राप्तीचा मार्ग आहे. तेच आपल्या खऱ्या सुखाची प्राप्ती करून देऊ  शकतात. कारण ते एकमेव ठिकाण असे आहे की, “”तेथे माया स्पर्शो शकेना”। (समर्थ) आमची गत कस्तुरी मृगा सारखी झाली आहे. कस्तुरी खरे तर त्याच्या नाभीतच असते; पण तिचा शोध घेते तो रानोमाळ भटकत सुटतो. सुखाचा खरा झरा आमचेच जवळ आहे पण त्याचा शोध आम्ही हया भौतिक पसाऱ्यात घेण्याचा प्रयत्न करतो व अधिकाधिक दुःखी होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हया पाच विषया पासून मिळणारे सुख हे सुख नसून सुखाचा आभास आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, “”विषय जनीस सुखे । सौख्य होणार नाही.

म्हणून संत सत्‌गुरू सांगतात कोणत्याही दिशा निवडा सर्व चुकीच्या आहेत. हळू किंवा जोरात धावायचे हा ही प्रश्न नाही. आहात तेथेच थांबा. 11 व्या दिशेचा शोध घ्या. तेथेच सारे लपलेले आहे. ते म्हणजेच आत्म-सुख होय. आत्मा आणि सुख हे दोन नाहीतच. सुख म्हणजे आत्मा. व आत्मा म्हणजेच सुख. म्हणूनच सुखाचा शोध घ्यायचा असेल तर आत्म्याचा वेध घावा लागेल. सुखाची अपेक्षा म्हणजेच आत्मसुखाची अपेक्षा होय. दासबोध, गीत-ज्ञानेश्वरी, भागवत हेच सांगण्याकरिता आहे. विषयांच्या प्राप्तीने क्षणिक सुखाचा आभास होत असेल तर आत्माच्या प्राप्तीने मनुष्य सुखरूप होतो. ज्याला पुन्हा पुन्हा सुखी व्हावे लागत नाही तोच सुखरूप होय. विषय निरपेक्ष सुख म्हणजेच आनंद होय. ज्ञानदेवांनी सुखाची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात.

          किंबहुना सोये। जीव आत्म्याची लाहे।

           तेथे जे होये। तया नाम सुख ।। (ज्ञानेश्वरी)

अर्थ ः फार काय सांगावे जीवाला आत्म्याचा लाभ होतो म्हणजे जीव आत्म्याचे मिलन होते, तेव्हा तेथे जी स्थिती प्राप्त होते, त्या स्थितीला सुख हे नाव आहे.अज्ञान हेच खरे तर दुःखाचे मुळ आहे. म्हणून अज्ञान घालविणे म्हणजे स्वरूपावर आरूढ होणे होय. आत्मसुखावर असलेल्या तनुचतुष्ठयाचे आवरण क्र माक्रमाने बाजूला सोलून काढले की त्या आवरणाचे आत असलेले आत्मसुख व्यथीत होेते आणि साक्षात अनुभव येतो. या चार देहांची सालपटे सोलून काढली की आत्मदर्शन होते. या आत्मदर्शनाचे सुख हेच सोलिव सुख होय असे संत रामदास स्वामी सांगतात. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या उत्तरोत्तर सूक्ष्म होत जाणाऱ्या देहांचा निरास करीत करीत स्वरूपाकार होणे म्हणजे देहात्मते कडून देहातीतते कडे केलेला प्रवास आहे. म्हणून सोलीव सुखाच्या अनुभूती करिता संत तुकोबा म्हणतात, “”देवा आता ऐसा करी उपकार । देहाचा विसर पडो मज । तरीच हा देह पावे माझा । बरके  केशीराजा कळो आले।। म्हणूनच समर्थ म्हणतात, देहबुध्दी ते आत्मबुध्दी करावी ।देहाचा संग सोडून देहातील झाल्यावर येणारी परब्रम्हाची अनुभूती हेच सोलीव सुख होय. देहाचा संग सुटल्या शिवाय आनंदाचे कंद असेल. आत्म्याचे म्हणजेच परब्रम्हाचे दर्शन होणार नाही. हे स्वरूपाचे दर्शन म्हणजे आत्म्सुख होय. तेच खरे वा वास्तविक सुख होय. त्यालाच समर्थांनी सोलिव सुख म्हटले आहे.

आपल्या वैदिक धर्मात ईश्वर प्राप्ती हेच जीवनाचे सार्थक होय असे म्हटल्या जाते. म्हणून आपण स्वरूप साक्षात्कारांत आनंद वा सुख मानतो. पाश्चात्य देशांत भौतिक सुखालाच महत्व दिले जाते. त्यामुळे त्यांचे जीवन बेबंदशाही सारखे झालेले आहे. भारतात सुध्दा चार्वक नावाचा भौतिक वादी होऊ न गेला असून तो देह सुटला हेच खरे सुख असे मानतो. त्याचे तत्वज्ञान असे आहे..

      यावज्जीवेत सुख जीवेत, अृणं कृत्वा धृतं पिबेत।

     भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः ।।

याचा अर्थ असा की जोपर्यंत जीवंत आहोत ता पर्यंत मौज मजा करून घ्या. पाहिजे तर कर्ज काढून तूप घ्या. याचाच अर्थ विलास करा. एकदा देहाची राख झाली की पुढे कुठे जन्म मिळणार आहे? परंतु आपले वेदांती सांगतात, देह हा पंचभौतिक असून तो नाशिवंत आहे तर देह ज्याच्या सत्तेवर कार्य करतो, तो आत्मा अमर आहे. म्हणजे त्याला मृत्यू नाही. म्हणून जे आत्मसुख तेच अखंड सुख आहे.

भौतिक सुखााचे दृष्टीने विचार केला; तर ते सुख किती आहे? कवी म्हणतात, “”एक धागा सुखाचा अन्‌ शंभर धागे दुःखाचे। किंवा तुकाराम महाराजांचे शब्दांत, “”सुख पाहता जवा पाडे। दुःख पर्वता एवढे. याचाच अर्थ सुख अगदी अल्प असून दुःखच जास्त आहे. म्हणूनच भौतिक सुखाच्या नादी न लागता आत्मसुखाची प्राप्ती करून घ्यावी. तेच खरे सुख आहे, शाश्वत सुख आहे. वास्तविक सुख आहे.

“”जय जय रघुवीर समर्थ”

श्री. क. वि. नाशिककर

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *