Cart

No products in the cart.

सात या अंकाचे महत्व

सात अंक म्हणजे पूर्णत्व सात अंक म्हणजे नवनिर्मिती.  प्रत्येक सात वर्षानंतर माणसाच्या आयुष्यात स्थित्यंतरे येत असतात.  प्रत्येक सात वर्षानंतर माणसाच्या शरीरात बदल होत असतात.

1 ते 70 या वयापर्यंत माणसाच्या आयुष्यात कशाप्रकारचे बदल होतात ते आपण पाहू.

वय वर्षे1 ते 7 म्हणजे बालपण. बालपण म्हणजे निर्व्याजपणा, निर्मळता. जसे दिसतेय तसे जग असे समजण्याचा काळ. दुधाचे दात येण्याचा काळ.

वय वर्षे 7 ते 14 म्हणजे किशोर वय.  जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा काळ. आहे त्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळेपण शोधण्याकडे कल.  दुधाचे दात पडून नवीन दात येण्याचा काळ.

वय वर्षे14 ते 21 म्हणजे पौगंडावस्था. शरीरात बदल होणारा काळ, तारुण्याकडे नेणारा काळ, संपूर्ण आयुष्याचे भविष्य ठरविणारा काळ.

वय वर्षे21 ते 28 म्हणजे तारुण्याचा जल्लोष, आनंद, उत्साह, जोम, जोश.  प्रत्येक गोष्ट उपभोगण्याचा काळ.  स्वतःचे “मी’ पण शोधण्याचा काळ.

वय वर्षे 28 ते 35 म्हणजे शक्ती कणखरपणा, भविष्याबद्दल निर्णय घेण्याचा काळ. आयुष्यात जे मिळवायचे आहे त्या दृष्टीने पाऊल उचलण्याचा काळ.

वय वर्षे35 ते 42 आतापर्यंत काय केले अजून बाकी काय करायचे आहे त्याबाबत विचार करण्याचा काळ.  जे मिळवायचे आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा काळ.

वय वर्षे 42 ते 49 म्हणजे जबाबदारी, तडजोड तसेच जोखीम घेण्याचा काळ, प्रयत्नांची तीव्रता जे मिळाले नाही त्याची खंत करण्याचा काळ.  स्वतःला सिद्ध करण्याचा काळ.

वय वर्षे 49 ते 56 प्रौढावस्थ, स्थिरता, इच्छांची पूर्तता करण्याचा काळ. मिळाले त्यात समाधान मानण्याचा काळ.

वय वर्षे 56 ते 63 नवीन पर्वाची सुरूवात दुसऱ्यांना समजून घेण्याचा काळ. नवीन पर्वाची सुरवात कुठल्याही गोष्टी नवीन संधी म्हणून स्वीकारण्याचा काळ.  स्वतःला बदलण्याचा काळ.

वय वर्षे 63 ते 70 वृध्दत्व. मिळेल तसे स्वीकारण्याचा काळ, आठवणीत रमणारा काळ. अध्यात्माकडे वळणारा काळ, स्वतःची ओळख पटलेला काळ.

प्रत्येक माणसाचा जन्म 1 ते 31 या तारखातच होतो.  या तारखेतील दोन अंकाची बेरीज केली तर मूलांक 1 ते 9 च येतात. जन्मतारखेवरुन संपूर्ण जन्मतारखेची म्हणजे तारीख, महिना, वेळ यांची बेरीज करुन काढलेला अंक ज्याला भाग्यांक म्हणता.  तो अंकही 1 ते 9 या मूलांकातच येतो.

1 ते 9 या प्रत्येक अंकाचे आपले स्वतःची अशी वैशिष्टये आहेत. त्यांचे गुणधर्म आहेत. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या मूलांकाचा प्रभाव असतो. परंतु 7 हा अंक असा आहे की ज्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर कमी अधिक प्रमाणात असतो म्हणून 7 या अंकाला विशेष महत्व आहे.

ज्यांचा अंक 7 आहे त्या व्यक्तींना दुसऱ्यांना समजून घेण्याची कला अवगत असते. लाईफ पार्टनर असो अथवा बिझनेस पार्टनर त्यांच्या सोबत जुळवून घेता येते.

7 मूळ अंक असलेल्या व्यक्तींवर केतूचा म्हणजे नेपच्यून चा प्रभाव असतो. या अंकांच्या व्यक्तींना सतत बदल हवा असता. प्रवास करणे यांना आवडते यांची कल्पनाशक्ती चांगली असते. या व्यक्ती भावनाप्रधान असतात. यांचे धार्मिक बाबतीतले विचार वेगळे असतात, या व्यक्ती रुढीपूजक न रहाता स्वतंत्रपणे मत बनवितात.  यांच्याजवळ अतींद्रिय शक्ती असते, दुसऱ्यांच्या मनातील विचार सांगताच ओळखतात.  परदेश व्यवहाराशी यांचा संबंध येतो.

7 मूलांक असलेल्या व्यक्तींना रविवार आणि सोमवार शुभ असतात. तसेच हिरवा, फिकट पिवळा, पांढरा इत्यादी रंग विशेष शुभ असतात.

सौ. मंजुश्री अहिरराव

Recent Posts

Comments

 1. raghunath

  sir ,khup chan sangitale 7 no. chi mahiti

  February 20, 2012 Reply
 2. Rohini

  Thanx mam

  February 20, 2012 Reply
 3. mazya vadlancha bhagyank 7 aahe aani tumhi lihal aahe tasech te aahet.

  February 21, 2012 Reply

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *