Cart

No products in the cart.

वास्तू म्हणते तथास्तू

ज्या वास्तूत आपण राहातो त्याची कधी ना कधी वास्तुशांती पूजा केलेलीच असते. त्या वास्तुपूजेच्या वेळी अग्नेय दिशेला वास्तुपुरूषाच्या प्रतिमेचा निक्षेप केलेला असतो. तसा तो तुमच्या वास्तूत झालेला असेल, तसेच

नमस्ते वास्तुपुरूषाय भूशैय्यभिरत प्रभो ।।

ममगृहं धनधान्यादि समृध्दी कुरूं कुरूं संपदा ।।

अशी प्रार्थनासुध्दा आपल्या पूर्वजांनी केलेली असेल आणि म्हणूनच आपल्या वास्तूचे संरक्षण ती वास्तू देवता करीत असेल, त्या घराला समृध्दीसुध्दा प्राप्त करून देत असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वास्तूदेवता जशी घराचे संरक्षण करते तसेच आपल्या प्रत्येक विचारांना “तथास्तू’ म्हणून आशीर्वाद देते. त्यामुळेच आपण जसे विचार करू तसेच घडते. जसे आपण चांंगले विचार केले तर निश्चितच चांगले घडणार आणि जर वाईट विचार केले असतील तर त्याचे सुध्दा वाईट फळ आपल्यालाच भोगावे लागणार! हे सुध्दा 100 टक्के  खरे आहे आणि म्हणूनच घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याची ही जबाबदारी आहे की, त्याने स्वतःबद्‌दल परिवारातील इतर सदस्याबाबत व बाहेरील कुणीही व्यक्तीबाबत कधीही वाईट चिंतू नये, वाईट विचार मनातसुध्दा आणू नये. कारण वास्तू पुरूषाला(दैवाला) आपल्या कायिक, वाचीक व मानसिक अशा तिन्ही गोष्टी त्वरीत समजतात व तो लगेच “तथास्तू’ (म्हणजे तू जसे म्हणतोस तसेच होवो!) असे म्हणतो.

म्हणूनच घरांत नेहमी सकारात्मक विचार करावा. कधीही नकारात्मक आचार, उच्चार, विचार करू नये. या करीताच सर्वाचेच “”सदैव कुशल मंगल होवो” हाच विचार करावा. दुसऱ्याचे वाईट चिंतल्याने त्याचे काहीही वाकडे होत नाही परंतु त्याचा वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो.

घरांत सदैव प्रसन्न वातावरण ठेवा. ईश्वराला घरांत मानाचे स्थान ईशान्य दिशेत द्या. दररोज ईश्वराची पूजा, प्रार्थना करा. त्याचवेळी वास्तुदेवताचे सुध्दा स्मरण करा, वरील प्रार्थना म्हणा. सणासुदीला ज्यावेळी आपण भगवंताला जो महाप्रसादाचा नैवेद्य दाखवतो तोच एखाद्या लहानशा ताटलीत वास्तुदेवतेला दाखवावा.  घरात रोज पंच यज्ञ करा, म्हणजे काय ? तर देवाला नैवेद्य दाखवा, अग्निनारायणाला घास द्यावा, पितरांना सुध्दा तेच भोजन एखाद्या केळीच्या व कर्दळीच्या पानावर ठेवा. अतिथीला भोजन द्या. पण हे रोज शक्य नाही म्हणून एखाद्या गरिबाला चहा अगर बिस्किटे द्या व मुंग्यांना साखर घाला. हाच पंच यज्ञ होय. संध्याकाळचे वेळी देवाजवळ, तुळशीजवळ तीळाच्या तेलाचा दिवा लावावा, अगरबत्ती ओवाळा व त्याच वेळी घंटा नाद करा. हे केल्याने त्या कातरवेळी होणारा वाईट शक्तीचा प्रादुर्भाव किमान टळेल. तसेच त्यावेळेस तरी चांटींग मशीन लावून स्वामी समर्थांचा मंत्र रात्रभर सुरू ठेवा. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरणात मांगल्य येईल.

सकारात्मक विचार हा जीवनाचा पाया आहे. तेव्हा सदैव सकारात्मक विचारच करा. भगवंताला प्रार्थना करा, वास्तुदेवतेला प्रार्थना करा यामुळे तुम्हाला प्रसन्नता लाभण्यास मदत होवून उभारी मिळेल व तुम्ही यशस्वी व्हाल म्हणतात ना “”सत्य संकल्पाचा दाता नारायण” सत्य म्हणजेच सत्‌ अर्थात कायम टिकावू याचाच अर्थ शुभ विचार, हे नारायण आपोआप पूर्ण करत असतो. यास्तव घरांत सदैव शुभ विचारच करा म्हणजे वात्सुदेवतेने “तथास्तु’ म्हटले तरी आपले व कुणाचेच नुकसान होणार नाही. समर्थ सुध्दा संागतात,

जगामध्ये जगमित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र ।

कोठेतरी सत्पात्र । शोधूनि पहावें ।। (दासबोध 192ः19)

याचाच अर्थ असा की, जगात जगमित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जीभेपाशी आहे. आपण सदैव उत्तम माणसे शोधून काढावी व त्यांच्याशीच संपर्क ठेवावा. म्हणूनच आपल्या घरी आलेल्या नातेवाईक तसेच अभ्यागतांचे मनःपुर्वक स्वागत करा. “अतिथी देवो भवः’ असे म्हटलेेले आहे. तेव्हा त्यंाचा योग्य तो मान सन्मान राखा. घरात आलेल्या व्यक्तीला प्रथम थंड पाण्याचा प्याला द्या. त्याचे मन प्रसन्न होईल. तसेच तो जर रागावून तुमच्याशी भांडायला आला असेल तर पाणी प्यायल्याने त्याच्या रागाचे क्षमन होईल म्हणूनच गुजराथी समाजांत ही प्रथाच झालेली आढळते. प्रत्येक समाजांत काही चांगल्या व सहज स्विकारण्यासारख्या प्रथा असतात. तेव्हा विवेकाचा वापर करून त्याचा अंगीकार करावा. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण अधिक प्रसन्न व अल्हाददायक हेाण्यास त्यांचा उपयोगच होईल.

श्री. क. वि. नाशिककर

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *