Cart

No products in the cart.

वास्तुशास्त्र आणि विज्ञान

वास्तुशास्त्राबद्दल कुतुहल, जिज्ञासा व मागणी खूप मोठया प्रमाणावर आहे. वास्तुशास्त्र म्हणजे पाच तत्त्वे व आठ दिशा यांचा संतुलित समन्वय साधणे, तसेच पृथ्वीची गुरूत्वाकर्षण शक्ती, विद्युत चुंबकीय शक्ती, वैश्विक ऊर्जा व परग्रहावरून येणाऱ्या कॉस्मिक ऊर्जा या सर्वांचा मानवी  जीवनावर होणारा प्रभाव व त्याला अनुलक्षून केली जाणारी वास्तुनिर्मिती व रचना म्हणजे वास्तूशास्त्र.

दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे निसर्गाशी एकरूप होण्याचा एक मार्ग. निसर्ग शक्तीचा आविष्कार पूर्णपणे प्राप्त करून त्यातून आपले जीवन सुखकर करण्याचा एक मार्ग म्हणजे वास्तुशास्त्र. इंग्रजीमध्ये वास्तुशास्त्राची व्याख्या करताना अशा प्रकारे ओळख करून देता येते. या ठिकाणी चशींर या शब्दाचा अर्थ ईश्वरीय शक्ती अथवा अध्यात्म या अर्थाने वापरला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांचे सुरेल संगम असणारे शास्त्र म्हणजे “वास्तुशास्त्र’.

पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आकाश, जल, अग्नी व वायू. ही सर्व पंचमहाभूते स्वयंभू आहेत. म्हणजे हे कोणी निर्माण करीत नाही अथवा त्यंाचा नाश करू शकत नाही. निसर्गातील सर्व गोष्टी पाच तत्वांमधून साकारतात आणि अंतिमतः याच पाच तत्वांत विलीन होत असतात.

निसर्गातील प्रत्येक सजीव अथवा निर्जीव वस्तू याच पाच तत्वांची बनलेली आहे. आपला देह, आपली वास्तू, सभोवतालच्या सर्व वास्तू याच पाच तत्त्वांच्या एकत्रिकरणातून साकारतात. अणू आणि मूलद्रव्यांच्या संकल्पनेप्रमाणे निसर्ग मूलद्रव्य आहे, तर मनुष्य देह हा अणू मानला जाऊ  शकतो आणि दोघांच्या गुणधर्मातील साधर्म्य सिद्ध होत असते.

मनुष्य देहातील रक्त (जलतत्त्व), श्वास (वायूतत्व), जठराग्नी, ऊर्जा, कॅलरीज, शरीर गरम असणे (अग्नीतत्व), शरीरातील अनेक पोकळया (आकाशतत्व) तर मांस आणि हाडे (पृथ्वीतत्त्व) हे सारे पंचतत्त्वांचेच मिश्रण असल्याचेच द्योतक आहे. आपली वास्तुसुद्धा विटा, सिमेंट, लोखंड हया पंचतत्वांतून साकारणाऱ्या वस्तूंपासूनच निर्माण होते. आत्म्याचे घर म्हणजे मानवी शरीर. तसे शरीराचे घर म्हणजे आपली वास्तू आणि ही वास्तू निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवी शरीर आणि निसर्ग यामध्ये सतत विविध ऊ र्जांची देवाण-घेवाण चालू असते. निसर्ग  आणि मानवी शरीर यांच्यामध्ये येते ती वास्तू आणि ही वास्तू या ऊ र्जा आदान-प्रदानास पूरक ठरणे म्हणजेच वास्तू वास्तुशास्त्रानुसार आहे असे म्हणता येते. मानवी शरीर व निसर्ग याच्यातील समन्वयाला जर  वास्तुमुळे अडथळा येत असेल, तर त्याचा अर्थ निसर्गशक्तीचा अविष्कार पूर्णपणे प्राप्त होत नसून ती वास्तू त्रासदायक असे मानले जाऊ  शकते.

निसर्गशक्तीच्या विविध ऊर्जा आदान-प्रदानात खालील काही गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करणे आवश्यक ठरते.ईशान्य दिशा जास्तीत जास्त मोकळी, हलकी, उताराची असावी, तसेच या दिशेत जास्तीत जास्त दरवाजे खिडक्या असाव्यात, ज्यामुळे सकाळची सूर्यकिरणे घरात जास्त प्रमाणात येऊ  शकतील. त्यातील अतिनील किरणांमुळे घराचे निर्जंतुकीकरण होईल. त्यातून शुद्ध व प्रसन्न वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

 • ईशान्य दिशेतील भूगर्भांतर्गत जलसाठा म्हणजे अतिनील किरणांचा प्रभावामुळे पाणी शुद्धीकरण तसेच अधिक अतिनील किरणांचा साठा या दिशेत होण्यास मदत. परिणामी शारीरिक व मानसिक चैतन्य  वृद्धीस मदत होते.
 •  पृथ्वीच्या स्वतःभोवती तसेच सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे वैश्विक ऊर्जेचे आगमन ईशान्य भागात जास्त होण्यामुळे त्या दिशेला सामोरे जाऊ न मुलांनी अभ्यास करणे, प्रौढांनी आपली सर्व कामे करणे म्हणजे शरीर मन व बुद्धीस चैतन्य प्राप्त होऊ न कार्यक्षमता, एकाग्रता व मनःशक्ती अधिक चांगल्या प्रकारे साध्य करता येते.
 • ईशान्य भागातील देवघर रचनेचे प्रयोजनसुद्धा ईश्वरीय पवित्र ऊ र्जाशक्तीचा विकास अधिक चांगला होणे, तसेच पूजा अथवा ध्यानधारणा करतानासुद्धा वैश्विक ऊ र्जेच्या प्रभावामुळे मनःशांती अधिक चांगल्या प्रकारे साध्य करता येते.
 • ईशान्य ही देवांची (पॉझिटीव्ह) दिशा मानली जाते, तर नैॠत्य ही राक्षसांची (निगेटीव्ह) दिशा मानली जाते. ज्याप्रमाणे भौतिक विज्ञानात धन आणि ॠण कणांचे संतुलन साध्य झाल्याशिवाय ऊ र्जा चक्र पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे निसर्गातसुद्धा सत्‌-असत्‌ शक्तींचे संतुलन अत्यावश्यक आहे.
 • आग्नेय दिशेतील किचन म्हणजे अतिनील किरणे आणि सकाळची सौम्य ताम्रकिरणे पूर्व दिशेतून आग्नेय दिशेतील 45 अंशाचा प्रवास करून तेथे प्रवेश करतात व त्यामुळे किचनमधील वातावरण जंतूविरहित होते.
 • आग्नेय दिशेतील किचनमध्ये पूर्व भिंतीवर खिडकी असणे वास्तुशास्त्राला अभिप्रेत आहे; कारण पश्चिमेकडून येणारी हवा पूर्वेच्या खिडकीतून जाताना सर्व प्रदूषण दूर करते आणि प्रसन्न व शुद्ध वातावरण नैसर्गिकरीत्या निर्माण करते.
 • किचनमध्ये काम करतेवेळी स्त्रियांचे तोंड पूर्वोत्तर भागात असावे; कारण किचन म्हणजे  उष्ण, कोंदट वातावरण आणि अशा वातावरणात प्रदीर्घकाळ काम करणे आरोग्यास त्रासदायक असते. अशावेळी स्त्रियांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहाण्यास पूर्वेकडून येणारी सात्त्विक ऊ र्जा मदतकारी ठरते.
 • आग्नेय दिशा स्वयंपाकघर, अग्नीतत्व हे एक समीकरण तर गृहलक्ष्मी कुटुंबसंस्थेतील एक महत्वपूर्ण घटक, किचन म्हणजे गृहलक्ष्मीचे कार्यक्षेत्र हे दुसरे समीकरण. या दोन्ही समीकरणांचा एकत्रित विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आग्नेय दिशेत किचन असणे म्हणजे त्या वास्तुमधील स्त्री शक्ती सशक्त व कार्यशील असणे शक्य होते जे आजपर्यंत हजारो वास्तुंच्या परीक्षणात सिद्ध केलेले आहे. पण जर का आग्नेय दिशेत वास्तुदोष आला, स्वयंपाक खोली अन्य दिशेत वेगळे पंचतत्वाच्या अधिपत्याखालील क्षेत्रात गेले तर तेथील उर्जासंतुलन विचलित झालेली नक्की आढळते. आमच्या संस्थेच्या (वास्तुशास्त्र एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फांऊ डेशन) माध्यमातून हजारो वास्तुंचे परीक्षण करून अग्नेय दिशेतील स्वयंपाक घर व सशक्त संतुलीत स्त्री शक्ती आणि चुकीच्या दिशेतील स्वयंपाक घर व शारीरिक अथवा मानसिक दृष्टया विचलित स्त्री शक्ती हे हजारो उदाहरणांसह सिद्ध करण्यात यशस्वी झालेलो आहोत. इंग्रजी साहित्यात एक म्हण आहे की, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक कर्तबगार स्त्री असते; तर वास्तुशास्त्रानुसार असे म्हणता येईल की, प्रत्येक कुटुंबाच्या यशामध्ये एका कर्तबगार गृहिणीचा सिंहाचा वाटा असतो पण त्या गृहिणीच्या कर्तबगारीचे रहस्य आग्नेय दिशेतील किचन मध्ये दडलेले असते.
 • वास्तुशास्त्रानुसार दक्षिण ते पश्चिम भाग जास्तीत जास्त बंदिस्त असावा. कमीत कमी दारे खिडक्या असाव्यात, उंच आणि जड असावा. उतार, खड्डा, पाणी या गोष्टी या भागात असु नये.
 • सकाळच्या सत्रातील सुर्यकिरणांपासुन लाभदायी अतिनील किरणे (अल्ट्राव्हॉयलेट) मिळतात जे मानवी जीवनास लाभदायी असतात. परंतु दुपार नंतर सुर्य माध्यान्ही येतो. म्हणजे पूर्ण सुर्य प्रतिबिंबातून भेदक प्रखर किरणांचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो. सकाळची सुर्य व पृथ्वीची तसेच माध्यान्हीचा सुर्य आणि पृथ्वी यांच्यातील स्थलांतरण पाहता सुर्य व पृथ्वी मधील कमी झालेले अंतर, या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे दुपारी बारा ते सायंकाळी पाच-सहा पर्यंत अत्यंत तीव्र भेदक व त्रासदायी ताम्र म्हणजे इन्फ्रारेड किरणांचा वर्षाव जास्त होतो. या भेदक किरणांचा आपणास जास्त त्रास होऊ  नये म्हणून दक्षिण-पश्चिम भागात कमीत कमी दारे-खिडक्या असावीत जेणे करून अतिदाहक किरणे आपल्या घरात येणार नाही. हा भाग उंच, बंदिस्त अथवा जास्त जाड भिंतीचा केल्याने या दाहकतेचा त्रास त्या वास्तुमधील लोकांना होत नाही.
 • दक्षिण पश्चिम भागात जास्तीत जास्त पसरणारी, वाढणारी, जडत्व निर्माण करणारी झाडे लावली म्हणजे सुद्धा या किरणांच्या दाहकतेपासुन वास्तुचे संरक्षण करता येते.
 • आपल्या प्लॉटमध्ये वास्तुचे स्थान निश्चित करतांना सुद्धा दक्षिण-पश्चिम भागात कमीत कमी जागा मोकळी सोडावी किंवा या भागातील कंपाऊं ड वॉल अति उंच असावी यामागे शास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे वास्तुचे वाईट शक्तींपासुन सरंक्षण करावे हाच असतो.
 • या भागात खड्डा, पाणी, उत्तार यामुळे अधिकाधिक ताम्र किरणांचे शोषण या भागात होऊ न एकूण सर्व वातावरण निर्जीव, भकास घातक होते. परिणामी वास्तुमधील व्यक्तींचा कार्यशक्ती कमी होऊ न अधोगती त्रास पीडा वाढतात परिणामी पराभूत मानसिकता वाढीस लागून  आर्थिक नुकसान, अधोगती, घातपात अपघात अशा गोष्टींना सामोरे जावे लागण्याची आपत्ती येते.
 • नैॠत्य दिशा म्हणजे पृथ्वी तत्व. याचा अर्थ या भागात जडत्व असणे अत्यावश्यक असते. भौतिक शास्त्रातील जडत्वाचा नियम आधारे जडत्व म्हणजेच स्थिरत्व या सिद्धांतावर आधारित विश्लेषणाचा परिपाक म्हणजेच जडत्वातून स्थिरत्व प्राप्त होते.
 • पृथ्वी आपल्या उत्तर-दक्षिण अक्षात सुमारे 23 अंशाने झुकलेली असल्यामुळे या तत्वानुसार या पृथ्वीतलावरील प्रत्येक अणू रेणूची म्हणजेच वास्तुची रचना करतेवेळी प्रत्येक ठिकाणी ईशान्य हलकी व नैॠत्य जड केल्याने या पृथ्वीच्या रचनेतील लयबद्धता कायम राखण्यास मदत होऊ शकते. तसेच या भागात जास्तीत जास्त स्टोरेज अथवा जडत्वामुळे तसेच मुख्य शयनगृह माध्यमातून कुटुंबप्रमुखाचे प्रदीर्घ वास्तव्य आयोजन केल्यामुळे त्याच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करण्यास मदत होते.
 • पश्चिम ते वायव्य भागात शौचालय, सेप्टीक टॅंक, धान्याचे स्टोरेज, जनावरांचा गोठा, भोजनगृह, अभ्यासिका, मोठया मुलांची अथवा पाहुण्याची शयनखोलीचे आयोजन करणे आवश्यक असते. वैज्ञानिक दृष्टया सुर्यप्रकाशातील प्रखर ताम्रकिरणांच्या माध्यमातून शौचालय, सेप्टीक टॅंक व गुरांचा गोठा येथील चिवट किटांणूचा नाश होण्यास मदत होते हेच वातावरण भोजन अथवा अभ्यासासाठी पोषक असते. धान्य साठयात सुद्धा जीवांणूचा नाश तसेच वायुद्वारे तेथील आर्द्रता कमी राखण्यात कोरडे वातावरण निर्माण करण्यास मदत होते व परिणाम धान्य प्रदीर्घ कालावधीसाठी चांगले राखण्यात नैसर्गिक रित्या मदत होते.
 • झोपतांना डोके दक्षिण दिशेला असावे म्हणजेच पाय उत्तरेला असावे असे वास्तुशास्त्र सांगते. या मागील विज्ञान लक्षात घेता मानवी शरीरात डोकं म्हणजे चुंबकीय तत्वानुसार उत्तर ध्रुव व पाय म्हणजे दक्षिण ध्रुव. मानवी शरीराचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या दक्षिण धु्रवाकडे ठेवल्यास विजातीय ध्रुव तत्वांमध्ये आकर्षण तर समजातीय ध्रुवांमध्ये विकर्षण म्हणजे एकमेकास दूर ढकलण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे दक्षिण-उत्तर डोके व पाय करून झोपल्यामुळे पृथ्वीच्या विदयुत चुंबकीय क्षेत्रात शरीर योग्यरित्या स्थिरावेल. रक्तामधील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन म्हणजे लोहतत्व असते. लोहतत्व नेहमी विदयुत-चुंबकीय क्षेत्र लवकर स्थिरावल्यानेे रक्तप्रवाह संथ व सुलभरित्या होतो. या हिमोग्लाबिनद्वारे आपण झोपेत असतांना शरीरातील एकूण-एक पेशींना प्राणवायूचा पुरवठा सर्वार्थाने संथ-प्रमाणबद्ध व प्रभावीरित्या होऊ न शरीरास खऱ्या अर्थाने पूर्ण आराम मिळून आपले तन आणि मन पूर्णरूपाने ताजेतवाने होऊन सकाळी उठल्यावर खऱ्या अर्थाने नविन दिवसाच्या नव्या समस्या व आव्हाने पेलण्यास समर्थ असते. तेच जर हे शरीर झोपेत पृथ्वीच्या विदयुत-चुंबकीय प्रवाहाच्या उलट दिशेत ठेवल्यास शरीरातील अंतस्थ रचना-प्रणाली व निसर्ग यांच्यात असमन्वय राहून शरीरास आराम मिळत नाही व एकूण कार्यक्षमता कमी होते.
 • मुलांनी अभ्यास करतांना व प्रौढांनी त्यांची सर्व कामे करतांना त्यांचे तोंड उत्तर-पूर्व भागाकडे असावे असे एक वास्तुशास्त्रीय तत्व आहे. आणि याला सुद्धा वैज्ञानिक पार्श्वभूमी व आधार आहे. आपण ज्यावेळी बसतो त्यावेळी पाठ सरळ असणे आवश्यक असते. त्यात जर पाठ सरळ रहाण्यास भक्कम मोठा व सरळ आधार मिळाल्यास अति उत्तम ठरते. परिणामी शरीर कार्यक्षम रहाण्यास व मन प्रभावीरित्या उत्साही रहाण्यास मदत होते. तसेच चेहरा उत्तरपूर्वाभिमुख केल्याने एखादे वाहन जसे पुढे जाते तसे हवा समोरून अधिक वेगाने येते. याच तत्वानुसार पृथ्वी पुढे सरकते तेव्हा समोरून वैश्विक उर्जा पृथ्वीवर आदळत असते. थोडक्यात अभ्यास करतेवेळी; तसेच सर्व प्रौढ व्यक्तींनी आपली नित्याची सर्वच कामे करतांना पाठीला दक्षिण-पश्चिम भिंतीचा भक्कम आधार व चेहरा उत्तर पूर्वेकडे ठेवल्यास सकारात्मक उर्जेचा अविष्कार प्राप्त होऊ न अधिक उत्कृष्ट व प्रभावी काम करण्यात यश मिळविता येते.
 • वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वास्तु चौकोनी किंवा आयताकृती असावी. अशा वास्तुमधील उर्जा स्पंदन लहरी लयबद्ध रितीने प्रवाहित होतात परिणामी प्रसन्न वातावरण निर्मितीस मदत होते. भौतिक शास्त्रानुसार सर्वप्रकारच्या उर्जा लहरीचे वहन स्पंदनात्मक पद्धतीने होत असते. आधुनिक (खासकरून अशिया खंडातील) गृहनिर्माण प्रणालीमध्ये इमारत आकर्षक दिसण्यासाठी विविधांगी आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी चौकोनी आकाराला तडा जाऊन, अनेक प्रकारचे विक्षीप्त आकार व त्यातून कट्‌स निर्माण होतात. परिणामी सर्व उर्जा लहरीची लयबद्धता लोप पावून अत्यंत अलयबद्ध उर्जा लहरी निर्माण होऊ  लागतात, त्यामुळे वास्तु वातावरणातील प्रसन्नता-पवित्रता लोप पावून निरूत्साही व मानवी जीवनास अपोषक वातावरण निर्माण होतो.
 • निसर्गातील सर्व घटनाचक्रांमध्ये एक लयबद्धता व नियमितता असते. निसर्ग पंचतत्वांमधून साकारलेला आहे. सर्वत्र व सतत एक जडणघडणाची क्रिया चालू असते तर दुसरीकडे विघटनाची प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते. जडणघडण व विघटन या दोन्ही क्रियांमध्ये मूलभूत घटक पंचमहाभूतेच असतात. प्रत्येक नवनिर्मिती मध्ये पाच तत्व एकत्र येत असतात व प्रत्येक विघटनामध्ये ही पाच तत्वे पुनः पुनः आपल्या स्वतंत्र अस्तित्वात परत येत असतात.

आपणास मिळणारे अन्न म्हणजे जमिनीत (पृथ्वी तत्वात) बीजारोपण. त्यास पाणी (जलतत्व) मिळाल्याने बीजांकुर निर्माण होतो. बीजांकुरातील रासायनिक घटक हरितद्रव्य सुर्यप्रकाशातून (अग्नीतत्व) अतिनील किरणे शोषून घेतात. वायुतत्वातून प्राणवायू व कर्षद्विल वायुचे समायोजन करतात तर जमिनीतून खनिजतत्वांचे शोषण करून आपले अन्न तयार करतात. परिणामी बीजांकुराची परिणती पूर्णरूपी वृक्षात होते. त्यातून फुले, फळे व अन्न तयार होते. हे सर्व भूतलावर आकाश छत्रातील साकारत असते. हाच वृक्ष पुढे नैसर्गिक अथवा अनैसर्गिकरित्या पडल्यास अथवा तोडल्यास लाकडाचे विघटन होऊ न त्यातील सर्व पाच तत्वे आपल्या मूळ स्थानात परत गेलेली दिसतात. थोडक्यात वनस्पती व अन्ननर्मिती मध्ये पंचतत्वाची भूमिका महत्वपूर्ण आहे. हेच पंचतत्व वास्तुशास्त्राचे अविभाज्य अंग आहे.

 •  सृष्टीमधील जलचक्रामध्ये सुद्धा पंचमहाभूताचे अस्तित्व आहे. पृथ्वीवरील (पृथ्वीतत्व) पाण्याचे (जलतत्व) सुर्य उष्णतेमुळे (अग्नीतत्व) वाफेत (वायुतत्व) रूपांतर होते. त्यात पृथ्वीवरील धुलीकण मिश्रीत होऊ न त्यांचे ढगात रूपांतर होते. पृथ्वी व अवकाशामधील (आकाशतत्व) वातावरणातील वायुदाब व उष्णता यांच्या संघर्षातून आकाशस्थ ढगांमध्ये कडकडाट व परिणामी पाऊ स या संपूर्ण जलचक्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पंचमहाभूते आहेत व पुनः एकदा प्रस्थापित होते की वास्तुशास्त्रात सुद्धा याच पाचतत्वांची भूमिका महत्वपूर्ण आहे.

डॉ. रविराज अहिरराव (पीएच. डी)

 

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *