Cart

No products in the cart.

वास्तुशास्त्राचा नातेसंबंधावर प्रभाव

वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशा हे वायुतत्वाच स्थान आहे. वायू म्हणजे वारा … वाहत रहा. आपल्या मार्गात येणाऱ्यांना वारा कधी घेऊ न जातो किंवा गतिमान करीत असतो. चंचलता, धरसोड प्रवृत्ती ही नेहमी वायव्येत दोष असतील तर दिसून येतात. या प्रवृत्तीमुळे माणसाचा स्वभाव आणि त्याच्या विचारांची दिशा, त्याची निर्णय व क्रियाही  सतत अस्थिर असते. किंवा बदलत जाते. त्याचा परिणाम त्याच्या नातेसंबंधावर नक्कीच होत असतो. कारण एखादी गोष्ट आज करू उद्या करू यामुळे गैरसमज निर्माण होतात किंवा त्या व्यक्तीबद्दल आपली विश्वासार्हता कमी होते.

वास्तूच्या वायव्य भागात, टॉयलेट सेप्टीक टॅंक, डायनिंग टेबल, मोठया मुलाची बेडरूम, पाहुण्यांची रूम, धान्यसाठा, स्टोअररूम इ. असायला हवे. ग्रामीण भाग असेल तर गुरांचे गोठे अशी रचना अपेक्षित आहे याला वैज्ञानिक दृष्टया तेवढाच आधार आहे.

मावळत्या सुर्यकिरणातील ताम्रकिरण चिवट किटाणू व जीवांणूचा नाश करतात, तर वायू तेथील दुर्गंधी बाहेर टाकतो. परिणामी शुद्ध व प्रसन्न वातावरण होण्यात वैज्ञानिक दृष्टया मदत होते.

थोडक्यात वायव्य दिशेचा तेथील वास्तूशास्त्र रचनेच्या माध्यमातून आपल्या वास्तूचे सुसंवाद आणि नातीसंबंध विकसित अथवा सुरळीत होण्यास खूप मोठा हातभार लागतो. परंतू जर या वायव्य दिशेची रचना वास्तूशास्त्राप्रमाणे नसेल तर निर्माण होणाऱ्या वास्तूदोषांमुळै विसंवाद आणि नातेसंबंधामध्ये तीव्र तणाव निर्माण होतो.

जर तुमच्या घरात वायव्येला मास्टर बेडरूम आली असेल तर वायूच्या प्रदीर्ष वास्तव्येमुळे दोघा पती पत्नीच्या स्वभावात एक समानता रहात नाही आणि धरसोड प्रवृत्तीमुळे खटके उडू लागतात किं वा वादविवाद होतात हे नक्की.

वायव्य दिशेत जर तुमच्या घरात किचन असेल तर वायुतत्वामुळे अग्नीतत्व तीव्र होणार व त्यामुळे भडका तरी उडणार किंवा आग पूर्णपणे विझणार . आग म्हणजे मोठया प्रमाणावर वादळ आणि भडका म्हणजे तीव्र संताप.

आम्ही जेव्हा घराचे वास्तुशास्त्र करतो तेव्हा जवळ जवळ अनेक घरांमध्ये मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो. ज्या ठिकाणी दोन पिढया एकत्र राहत असतात. दोन पिढयातील तणाव सगळया घरात कमी अधिक प्रमाणात असतो. त्यात वायव्य दिशेची भर पडली तर त्या घरातील सासुसूना किंवा इतर नात्यात ताण वाढणार अशावेळी विना तोडफोडच्या उपाययोजना देतो. ज्यावेळी एक गोष्ट प्रकर्षान जाणवते की अहंकारामुळे नांतेसंबंध खराब होतात. पण वास्तू दोष निराकरण उपाययोजनांमुळे अहंकाराच्या अग्नीत पडणार तेल आपण थांबवू शकतो. अहंकार शंात होण्याने स्वतः ध्यान-धारणा, नामस्मरण यासाठी माणूस प्रेरित होतो सात्विकता अंगी येऊ न शांतता निर्माण होते.

वायव्य दिशेत जर कार्यालय असेल तर टीम स्पिरीटला तडे जाऊ  शकतात. कार्यकर्त्यांमध्ये फूट पडते. घरकाम करणाऱ्या बायका टिकत नाहीत. या दिशेत अनेक दोष असतील तर पोलीस केस, कोर्टकचेरी अथवा शासकीय दिरंगाई अशा समस्या निर्माण होतात. पार्टनर किंवा भागीदारीत व्यवसाय करणारे त्यांच्या विचारांत द्वैत निर्माण होते. राजकारणात जनसंपर्क किंवा एक प्रकारचे नातेसंबंध निर्माण होतात त्या आधारेच पुढची प्रगती होत असते. पण तेथे पाय ओढणारे निर्माण होतात. परिणामी मित्र कमी शत्रु जास्त अशी परिस्थिती निर्माण होते.

म्हणून वायव्य दिशा ही सुसंवाद व नातेसंबंध टिकविणे व वृद्धिगंत करणे यासाठी फार महत्वाची आहे.

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *