Cart

No products in the cart.

वास्तुशांती का, कधी व कशी करावी?

वास्तुनिर्मितीच्या वेळेस भूमातेवर होणारे आघात जीवाणु किटांणुचा नाश व पंचमहाभूतांचे होणारे असंतुलन यांच्या शांतीसाठी वास्तुशांतीचा विधी केला जातो हे आपण मागील भागात पाहीले. वास्तुसौख्य प्राप्त करण्यासाठी व ईश्वरी शक्तीशी आपले संधान करुन देण्यासाठी वास्तोस्ष्पती / वास्तुदेवता यांचा निक्षेप वास्तुशांती विधीत अत्यावश्यक आहे. वास्तुशांतीची पूजा कशी करावी हे आपण पाहिलेच आहे. या पूजेसोबत कौटुंबिक जेवणावळी व सम्मेलन एकत्र करु नये.

वास्तुशांती हे निमित्त गाव जेवण उद्दीष्ट !

वास्तुशांतीचे हल्ली घराघरात हमखास आढळून येणारे स्वरुप म्हणजे केवळ “उपचार’. पहा ना ! पूजेला दांपत्य बसलेले असते, भटजी विधी पार पाडत असतात.  पण सौं. चे मन असते किचनमधे. आत वहिनींना जिरं, मोहरी सापडेल का? भाजीला कॉपर बॉटम कढई घेतली आहे का नाहीतर भाजी लागेल.  असे अनेक प्रश्न सौं.च्या मनात पूजेच्या वेळेस भिरभिरत असतात, शिवाय मस्ती करत बागडणाऱ्या मुलांच्या धडपडीकडे ही त्यंाच लक्ष असत.  मग भटजी बाईंना म्हणतात हाताला हात लावा.  तेव्हा कुठे सौ. भानावर येतात.  संपूर्ण विधीत त्यांचा धांदरटपणा सुरुच रहातो कारण सर्व लक्ष हे स्वयंपाक घरात बुडालेले असल्याने पूजेकडे लक्ष जातच नाही.  बाजूला बसलेले श्री सुध्दा या बाबतीत मागे नसतात.  पूजेला बसलेले असताना सुद्धा येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत चालूच असते.  अरे सुधीर आलास वा वा राईट टाईम. चहा, कॉफी काय लागेल ते घे. अरे सुधीरला पाणी आणा.  तेवढयात यजमानांचा मोबाइल वाजतो. पलिकडून मित्र संध्याकाळी भेटायला बोलावित असतो, तेव्हा पूजेला बसलेले आपले हे श्रीमान त्याला वास्तुशांती या पूजा कम गेटटुगेदरचे आमंत्रण देतात.  पाहुण्यांची गर्दी वाढू लागते.  गप्पांचे आवाज रंगु लागतात.  आणि श्री व सौ. दोघेही कधी एकदा पूजा संपते याची चातकासारखी वाट पहात बसतात.  शेवटी न रहावून काही यजमान भटजींना पूजा लवकर आटोपती घेण्यास सुद्धा सांगतात.  यजमानांच्या आज्ञेचा भंग न व्हावा यासाठी भटजी मग पूजा अक्षरशः उरकून घेतात. झालं!  श्री व सौ. टुण्कन आपल्या पाटावरुन उठतात.  जेवणावळी होतात, घर दाखविण्याचा कार्यक्रम मग यथेच्छ पार पाडला जातो.  उबंरठयापासून ते क मोड पर्यंत सर्व रसभरीत वर्णन पाहुण्यांना ऐकविले जाते मग सागवानी लाकूड खास इथून मिळवले, नी हे झुंबर अहमदाबादहून मागवलं त्यावेळी डीलरशी झालेला वादविवाद वगैरे वगैर अशी तपशीलवार माहिती यजमान व यजमानिणबाई पाहुण्यांना देतच असतात.

यजमान पती पत्नी जेव्हा आपल्या घराचे हे रसभरीत वर्णन, कौतुक पाहुण्यांसमोर करीत असतात.  तेव्हा वर वर वाहवा करणारे मनातल्या मनात विचार करत असतात.  अरे, घर घेतल्या घेतल्या रिनोव्हेशन पण केलयं म्हणजे नक्कीच दोन नंबरचा पैसा असणार, नाहीतर सासऱ्याला चांगला बकरा बनविलाय याने! अशा प्रकारे अनेक पाहुण्यांच्या या एकत्रित नकारात्मक विचार लहरी तुमच्या

पै पै वाचवून जमा केलेल्या घरकुलात वास करुन रहातात. पाहुण्यांना फक्त घरातला चकचकाट दिसतो पण ते घर उभे करण्यासाठी तुम्ही घेतलेले श्रम मात्र दिसत नाहीत, आणि मग वर्ष सव्वा वर्षाच्या आतच या मत्सरलहरी तुमच्या मागे समस्यांची मालिका सुरु करतात.

 मत्सरघातापासून सुरक्षित रहाण्यासाठी काय कराल?

आतापर्यंत माझ्या हजारो वास्तु परिक्षणानंतर असे लक्षात आले आहे की, नवीन वास्तुत प्रवेश केल्यानंतर एक ते सव्वा वर्षातच मत्सरघाताची तीव्रता वाढू लागते.  गेली अनेक वर्षे माझ्या सातत्याने होणाऱ्या नाटयप्रयोगांद्वारे शेकडो व्याख्याने, परिसंवाद, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया या माध्यमातून एक आगळी वेगळी संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न मी करत आलो आहे. ही संकल्पना प्रचलित शास्त्रापासून थोडी हटके आहे.  पण जर तुम्ही याचा अवलंब केलात तर त्याचे अतिशय उत्तम रिझल्टस्‌ मिळतील हे निश्चित.

नवीन घराची पार्टी आधी व नंतर वास्तुशांती.

नवीन घर घेतल्यानंतर सर्व आप्तस्वकीयांना बोलावून त्यांचा यथेच्छ पाहुणचार करावा.  त्यांना यथाशक्ती सप्रेम भेटवस्तू द्यावी.  आणि मनातल्या मनात अशी प्रार्थना करावी की, तुमच्या मनात जो काय मत्सर आमच्या विषयी आहे तो येथे सोडून जा. हा कार्यक्रम झाल्यानंतर लवकरात लवकर सुमुर्हत बघून कुटुंबातील मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत वास्तुशांतीची मनोभावे शास्त्रोक्त पूजा करावी. वास्तुशांतीच्या होम हवनातून मत्सर लहरींचा नाश होईल. एकाग्र चित्ताने केलेल्या पूजेचे फळ त्या दांम्पत्याला पर्यायाने त्या घराला निश्चितच मिळेल.

वास्तुशांती विषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास आमच्या कार्यालयाशी  दूरध्वनीवर संपर्क साधू शकता

022 – 6784 7600/01 – 06

डॉ. रविराज अहिरराव (पीएच.डी)

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *