Cart

No products in the cart.

वास्तुमधील वातावरण निर्मिती

देवदिनांनराणांच येषु रम्यतया चिरम ।

मनांसि च प्रसीदन्ति प्रासादास्तेन कीर्तीता : ।।

जेथे सौंदर्यामुळे प्रसन्न वातारणनिर्मिती होते व माणसांची मने प्रसन्न होतात त्या निवासस्थानांत प्रासाद असे म्हटले जाते. प्रासाद हा शब्द देव मंदिरासाठी व राजवाड्यांसाठीसुध्दा वापरला जातो.

वास्तुशास्त्रानुसार घराची रचना केल्यास आपोआप प्रसन्न वातावरणनिर्मिती होते व घरातील माणसे प्रसन्न रहातात. प्रसन्न वृत्तीमुळे माणसाच्या शरीरात रोग व मनात विकार निर्माण होत नाहीत सकारात्मक वृत्ती

वाढते, कार्यशक्ती, क्रियाशीलता वाढते व हातून उत्कृष्ट स्वरूपातले कार्य घडून येते. चांगले कार्य म्हणजे चांगला परिणाम व त्यामुळे यश व प्रगती सहजपणे साध्य होते. अशा घरातील व्यक्तींमध्ये वादविवाद होत नाहीत सुसंवाद राहातो. मतभेद होत नाही किंवा झाल्यास त्वरित सामोपचाराने दूर होतात.

वास्तुमधील प्रसन्न वातावरण निर्मितीमुळे माणसातील त्रिगुण (सत्व-रज-तम) संतुलित राहतात व आपल्या सभोवताली असलेल्या षडरिपूंपासून चित्त सावधानपणे दूर राहाते. कुठल्याही प्रकारे अहंकाराला डोके वर काढू देत नाही.

आपणा सर्वांचेच घर वास्तुशास्त्रानुसार असतेच असे नाही. अथवा नवीन घरसुद्धा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतले तरी शंभर टक्के वास्तुशास्त्रानुरूप असणार नाही. अशा वेळी विविध दिशांमधील वास्तुदोष व त्या दोषांचे दुष्परिणाम आपल्या जीवनात अशांतता व दु:ख निर्माण करीत असतात. या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळविण्यासाठी व घरातील वातावरण आनंदित व प्रसन्न ठेवण्यासाठी खालील गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.

1)      आपले देवघर प्रकर्षाने ईशान्य (अथवा पूर्व ते उत्तर) भागात येईल यास प्रथम   प्राधान्य द्यावे.

2)      देवपूजा अथवा ईश्वरचिंतन-नामस्मरण रोज नियमितपणे करावे.

3)      रोज देवाजवळ सकाळी शुद्ध तुपाचा शक्य झाल्यास गाईच्या तुपातील व सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा   नियमितपणे लावावा. सोबत दोन चार सुगंधित अगरबत्ती लावाव्यात.

4)      देवपूजा करताना श्लोक, मंत्र व स्तोत्रांचे उच्चारण स्पष्ट व उच्च स्वरात करावे. जेणे करून दिवा अगरबत्तीची ऊर्जा व मंत्रोच्चारांच्या ध्वनी लहरींमुळे वास्तुचे शुद्धीकरण होते.

5)      पूजेसोबत घंटानाद अथवा शंखनाद करावा. यामुळेसुद्धा वास्तुशुध्दीकरण होते.

6)      घरात नेहमी गायत्री मंत्रोच्चरण, कुलदेवी व इष्टदेवतांचे स्तोत्र-मंत्र-जप करावेत.दुर्गा सप्तशती, नवनाथ व गुरुचरित्राची पारायणे नियमितपणे करावी.

7)      वर्षातून कमीत कमी एक वेळा एखादी होमात्मक पूजा करावी.

8)      वास्तुमध्ये प्रवेश केल्यावर वास्तुशांती करावी.

9)      दर पाच ते दहा वर्षांनी एकदा वास्तुशांतीसारखा वास्तुयज्ञ करावा.

10)    प्रत्येक घरात (कुटुंबात) कुलदेवी पूजन, कुलधर्म कुळाचार नियमितपण करावा.

11)    वर्षातून एकदा अवश्य कुलदेवी दर्शनाला जावे.

12)    आपल्या कुटुंबातील मृतकांचे श्राद्ध आपआपल्या प्रथेनुसार नियमितपणे करावे. खासकरून सर्वपित्री अमावस्या श्राद्ध नक्की करावे.

13)    आपणास स्तोत्र मंत्र उच्चारण शक्य होत नसल्यास सकाळ-संध्याकाळ नित्यनियमाने या मंत्र स्तोत्रांच्या कॅसेट्‌स वाजवाव्यात.

14)    आपल्या कुटुंबाच्या पारंपारिक प्रथे प्रमाणे जास्तीत जास्त सण-उत्सव साजरे करावेत. या निमित्ताने घराची साफसफाई, शुध्दीकरण होते तसेच एक नवीन उत्साह-जोश घरातील सर्वांमध्ये संचारतो व वातावरण आनंदी-उत्साही करण्यास साहाय्यभूत ठरतो.

डॉ. रविराज अहिरराव (पीएच.डी.)

 

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *