Cart

No products in the cart.

वास्तुपरिक्षणातला माझा अनुभव II

सहा वर्षांपूर्वीचा माझा अनुभव आहे. मी व माझे दोन एक्सपर्ट मुंबईत वास्तुपरिक्षणाला गेलो होतो. मुंबईतल्या गजबजलेल्या ठिकाणी एका जुन्या बिल्डिंगमध्ये आम्ही शिरलो, तीन जिने चढून वर गेलो. डोअरबेल वाजविली, दरवाजा उघडल्या गेला, आणि दरवाल्यातलं ते आरस्पानी सौंदर्य बघून आमचा पुतळा झाला. साडेपाच फूट उंची, सडपातळ बांधा, गोरा गुलाबी वर्ण, ब्राऊ न कलरचे केस व डोळे, धारधार नाक, गुलाबी ओठ, चेहऱ्यावर मधाळ हास्य आणि ऐअरहोस्टेस सारखी साडी. अतिशय सुंदर असलेल्या त्या तरूणीने गोड आवाजात आम्हाला वेलकम केले व आम्ही आत गेलो. आतमध्ये गेल्यावर दुसरा धक्का, पाच ते सहा हजार स्क्ेवअर फुटचे ते खूप मोठे घर होते. बाहेरचा लिव्हिंगच आठशे नऊशे स्क्वेअर फूट असेल. आम्ही लिव्हिंग मधल्या सोफ्यावर बसलो. सर्व फर्निचर खूप जुने ब्रिटिश स्टाईलचे होते त्याच काळातले भलेमोठे कार्पेट. आम्ही स्थानापन्न झालो, दोन मिनिटातच तिची आई बाहेर आली, गोरापान रंग, स्थूल शरीरयष्टी, गुबगुबीत गालाची ती बाई म्हातार वयातही अतिशय गोड दिसत होती. तिच्या मागेच एक भूऱ्या रंगाचा बोका बाहेर आला. तो बोका म्हणजे तिसरे आश्चर्य, एवढया मोठया आकाराचा बोका मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिला नव्हता व त्यानंतरही कधी पाहिला नाही. तो बोका आमच्या जवळ आला व त्या बैठकीतल्या सर्वात मोठया होस्ट चेअरवर बसला. माझे सर्व लक्ष त्याच्याकडे होते, त्याची प्रत्येक स्टाईल मला वेगळीच वाटत होती. त्याच्या गळयात काळया रंगाचा बो होता, ब्रॉउनिश रेड कलरचे त्याचे डोळे होते, घरातल्या कर्त्या पुरूषासारखा त्याचा अविर्भाव होता. माझे संपूर्ण लक्ष त्या बोक्याकडे असल्यामुळे त्या बाईला वाटले की मला त्या बोक्याची भीती वाटतेय, त्या म्हणाल्या तो काहीही करणार नाही, अजिबात हरीर्षीश्र नाही.

कुटुंब पारशी असल्यामुळे माझ्याशी ते इंग्लिश मध्येच संभाषण करत होते. त्यांना त्यांची फॅमिली हिस्ट्री विचारली, घरात सध्या, ही तरूणी, जिने आम्हाला वास्तुपरिक्षणासाठी आमंत्रित केले होते, तिची आई व तिचा मोठा भाऊ  रहात होते. एक भाऊ  सहा सात वर्षापूर्वी अमेरिकेत गेला होता व तिथेच स्थायिक झाला होता. मोठया भावाने ग्रॅज्युएशन पूर्ण करून एम.बी.ए. केले होते परंतु कुठेही नोकरी मिळत नव्हती. ही तरूणी मुंबईतल्या एका मोठया पंचतारांकित हॉटेलमध्ये एच. आर. डिपार्टमेन्ट मध्ये कामाला होती. तिच्या आईने त्यंाचे प्रॉब्लेम सांगायला सुरूवात केली, तत्पूर्वी माझे दोन्ही एक्सपर्ट ड्रॉईग बनविण्यासाठी त्या तरूणी सोबत आत गेले.

तिच्या आईने सांगितले की चार वर्षापूर्वी तिचे मिस्टर अचानकपणे हार्टफे लने वारले होते. दोन नंबरचा मुलगा जो अमेरिकेत होता, तीन वर्षापासून त्याने घराशी संपूर्ण संबंध तोडला होता व तिकडेच एका फॉरेनर मुलीसोबत स्थायिक झाला होता. चार वर्षापूर्वी मोठया मुलाची नोकरी गेली, त्यानंतर त्याला कुठेही नोकरी लागली नाही. वडीलांचा खूप मोठा बिझनेस होता तो त्यांच्या पार्टनर्सनी हडप केला होता. त्यांच्या अनेक प्रॉपर्टीज होत्या, त्या सगळया कोर्ट के सेसमध्ये काही ना काही कारणाने अडकल्या होत्या. मुंबईतली एक जागा एका ऑॅफीससाठी भाडयाने दिली होती त्याच्यावर हयांचे कसेबसे भागत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची मुलगी जी उच्चशिक्षित होती व दिसावयासही अतिसुंदर होती, ती आता बत्तीस वर्षाची होती, परंतु तिचे लग्न जमत नव्हते. हया मुलीने स्वतःहून कोणासोबत लग्न जमविले नव्हते व तिचे कुठे अफेअरही नव्हते. अनेक मुलांसोबत तिचे लग्न जमवले परंतु काही दिवसांनी त्यांच्याकडून नकार यायचा त्या नकाराचे कारणही समजत नव्हते हया सर्व गोष्टीला कंटाळून त्या मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्या बाईला आरोग्याचे अनेक प्रॉब्लेम होते घराबाहेर ही बाई अजिबात जात नसे, मोठा मुलगाही सतत आजारी असे.

त्यांना विचारले हा बोका तुमच्याकडे कधीपासून आहे? तेव्हा त्यांनी सांगितले की पाच वर्षांपूर्वी  त्यांच्या मिस्टरांनी त्याला आणले होते. मिस्टरांचा त्याच्यावर अतिशय जीव होता व तोही त्यांच्यावर तेवढेच प्रेम करायचा. जेवतानाही त्यांच्या बाजूलाच बसायचा, त्यांच्या ताटातले काही जिन्नस ते त्याला खायलाही दयायचे. मिस्टर गेल्यानंतर कित्येक दिवस त्याने काहीही खाल्ले नव्हते. त्यानंतर मात्र हळूहळू हा बोका हया बाईच्या मागेमागे रहायला लागला. सतत तो त्यांच्यासोबतच असायचा, रात्री झोपतांना त्या बाईच्या बेडवर त्यांच्या जवळच झोपायचा. कित्येकवेळा त्यांना प्रेमाने गोंजरायचा, धीर दिल्यासारखा पाठीवरुन  हात फिरवायचा व कधी कधी त्याच्या डोळयातून अश्रूही पाझरायचे. आता त्या बाईंना त्या बोक्याशिवाय अजिबात राहवत नसे, त्यामुळे त्या कुठे बाहेरही जात नसे. त्या हे सर्व सांगत असताना माझे त्या बोक्याकडे लक्ष गेले तो सर्व ऐकत होता, व ते त्याला समजले असेही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

त्यानंतर मी डाऊझिंगच्या माध्यमातून काही टेस्ट घ्यायला सुरुवात केली. त्या बोक्यामध्ये कुणाचेतरी अस्तित्व आहे हे मला प्रथमदर्शनी त्याला पाहिल्यावर लक्षात आले होते. आता मला समजले की,हया बाईच्या मिस्टरांचेच अस्तित्व त्या बोक्यात होते. हयांच्या घरात अनेक नकारात्मक शक्ती वास करत आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली. हयांच्या मिस्टरांच्या जवळच्याच एका व्यक्तीला त्यांना पूर्णपणे बरबाद करायचे होते, त्यासाठीच त्यांनीच ब्लॅक मॅजिकच्या सहाय्याने अनेक गोष्टी घडवून आणल्या होत्या, त्यामुळे हयांचे घर नकारात्मक शक्तीने बाधित झाले होते. मिस्टरांचा जीव घरात व घराच्यांमध्ये गुंतला होता म्हणून गेल्यानंतरही त्यंाचे आस्तित्व त्या बोक्यात होते.

सर्व गोष्टी अतिशय किचकट बनल्या होत्या, त्यातून कशाप्रकारे हयांना बाहेर काढायचे हयाचाच मी विचार करत होते. तेवढयात माझ्या दोन वास्तु एक्सपर्टपैकी जी मुलगी होती ती माझ्याजवळ आली व मला म्हणाली “मॅडम मला ड्राईंग बनविणे जमतच नाही,  मॅप सारखा चुकतोय, त्यातच मी पडलेय माझा पाय मुरगळलाय’ तिला म्हटले, “बस थोडयावेळ मी रेकी देते बरे वाटेल’ नंतर  तिला आमच्या दुसऱ्या वास्तु एक्सपर्टचे काय चालू आहे म्हणून विचारले ती म्हणाली, तो त्याच्या पद्‌धतीने ड्रॉईंग बनवतोय, त्यालाही काही जमत नाहीय. एरवी ही मुलगी ड्रॉईंग बनविण्यात खूप एक्सपर्ट होती ती स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे खूप जलद गतीने ड्रॉईंग बनवत असे. परंतु आज हया इथल्या बाधित वास्तुमुळे तिला हा प्रॉब्लेम येत होता.

तिला रेकी दिली दोन मिनिटातच तिला बरे वाटायला लागले. तिला म्हटले, “चल मी येते तुझ्यासोबत आपण मॅप तयार करू या.’ असे म्हणून मी उठायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आले मला उठताच येत नाहीय, संपूर्ण शरीर जड झाले होते जणू काही मी त्या सोफ्याला चिकटून गेले होते. कितीही प्रयत्न केला तरी मला उठताच येत नव्हते, व माझी परिस्थिती मी जाहीरही करू शकत नव्हते. हया सर्वगोष्टीवरून आतले वातावरण किती भयाण असेल हयाची मला कल्पना आली, माझ्यावर एक प्रकारचे वेगळेच दडपण आले होते. परंतु पुढच्या क्षणाला स्वतःला सावरले व मनातल्या मनात स्वामी समर्थांचा व नवार्णव मंत्राचा जप करायला सुरवात केली, तसेच हनुमानाचा धावा सुरू केला दोन मिनिटातच साक्षात भगवान हनुमंताने दर्शनही दिले. मला हायसे वाटले व मी ताडकन सोफ्यावरून उठून उभे राहिले व तिला म्हटले “चल आपण आत जाऊ या’.

आत गेल्यानंतर तिला घराचा सेंटर पॉईन्ट कोठे आहे ते विचारले व तिथून घराच्या दिशा बघितल्या. घराच्या ब्रम्हस्थानातच त्या बाईंचा बेड होता नैॠत्येला मुख्य दरवाजा. सर्व रूम खूप मोठया मोठया होत्या. पूर्व दिशेला अति विशाल असे स्वयंपाकघर होते स्वयंपाकाचा ओटा एवढा लांबलचक होता, की एकाचवेळेस दहा – बारा बाया ओटयावर स्वयंपाक करू शकतील. अग्नेय दिशेला एक रूम होती, तिचा दरवाजा बंद होता त्यांच्या मुलीला म्हटले इथे काय आहे ?  तिने सांगितले की ती स्टोअर रूम आहे व ती नेहमी बंदच असते. आतमध्ये खूप भयानक प्रकार आहे हे मला लक्षात आले तिला म्हटले “ठिक आहे आपण नंतर बघूया. उत्तर दिशेला हया मुलीची रूम होती, तिथून आम्ही वायव्य दिशेच्या रूममध्ये गेलो.’ तिथे गेल्यावर आणखीन एक धक्का बसला त्या रूममध्ये बेडवर एक माणूस बसला होता. खूप उंच असावा, अति बारीक शरीरयष्टी, डोक्यावर बारीक केस, अतिशय खोल गेलेले डोळे व भकास आणि भयाण चेहरा. तिने सांगितले, “हा माझा मोठा भाऊ ‘ हा सतत इथेच बसलेला असतो, जेवणाचे ताट दिले तर जेवतो, नाही दिले तर उपाशीच रहातो. जबरदस्तीने बाहेर काढल्याशिवाय कधीच बाहेर पडत  नाही. आपल्या मनाशीच बडबड करत असतो. बऱ्याचदा दिवसा झोपतो रात्री जागा रहातो मध्येच हसत सुटतो, एरवी शुन्यात नजर लावून बसलेला असतो. ती मुलगी भावाबद्‌दल इतके सांगत असतानाही त्याच्या चेहऱ्यावर कु ठलेच भाव नव्हते, तो अगदी निर्विकार होता, जणू काही त्याला ते बोलणे ऐकायलाही जात नव्हते. तिथून आम्ही पश्चिमेच्या रूममध्ये आलो, आई व वडील पूर्वी त्या रूममध्ये झोपत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिला देवघर कुठे आहे म्हणून विचारले, तेव्हा आम्ही पुन्हा मधल्या हॉल मध्ये आलो जिथे आईचा बेड होता. त्या बेडच्या बाजूला कोरीव काम केलेले एक लाकडी पार्टीशन होते व त्या पार्टीशन पलीकडे देवघर ठेवलेले होते. तसे बघायला गेले तर पारशी लोक अग्नी उपासक असतात त्यामुळे त्यांच्याकडे मूर्तिपूजा नसते. परंतु बऱ्याच ठिकाणी मी मूर्ति ठेवलेल्या बघितल्या होत्या म्हणून मी तिला देवघराबद्‌दल विचारले. त्यात तिची आई मुळची पंजाबी होती त्यामुळे त्यांच्याकडे देवघर होते परंतु ते देवघर ब्रम्हस्थानात होते. देवघरात गणपती व देवीचा फोटो होता, कृष्णाची व देवीची मूर्ती होती व इतर एक दोन मूर्ती होत्या. तिला त्यांचे देवघर अत्यंंत चुकीच्या ठिकाणी असल्याचे सांगितले.

संपूर्ण घराची पाहणी करून मी पुन्हा लिव्हिंगमध्ये आले. ती व तिची आई दोघीजणी माझ्यासमोर बसल्या होत्या. माझी एक्सपर्ट आतमध्ये ड्रॉईंग बनवत होती. त्यावेळेस माझ्या लक्षात आले की माझा दुसरा एक्सपर्ट त्याला मी किचनमध्ये वही हातात घेऊ न काही करताना बघितले होते, त्यावेळेस तो काय करतोय हयाकडे मी लक्ष दिले नाही. आता माझ्या लक्षात आले की घरात शिरल्यापासून एकही शब्द न बोलता हा केव्हाचा काय करतोय ?  विचार केला जाऊ  दे , नंतर बघूया त्याने काय केलेय ते. आम्ही बाहेर बसलो असताना किचनमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला, तसेच पळत गेलो, माझी एक्सपर्ट पुन्हा पडली होती तिच्या पडण्यामुळे खुर्चीला धक्का लागला, खुर्चीही वाकडी तिकडी पडली होती. तिला विचारले “अग अशी कशी काय पडलीस.’ ती म्हणाली,  “मॅडम मी आता तिसऱ्यांदा पडली आहे आता मी ती स्टोअर रूम बघायला चालले होते व आपटले.’ तिला म्हटले, “तुला कुणी सांगितले तिकडे जायला’ , “मगाशीच सांगितले ना नंतर बघूया म्हणून’. “चल ड्राईंग झाले असेल तर बाहेर येऊ न बस.’ एकंदरीतच स्टोअर रूम मधल्या गंभीर स्वरूपाची मला पुन्हा कल्पना आली.

लिव्हिंगमध्ये आल्यावर त्यांना त्यांच्या घरातील वास्तुदोषांची कल्पना दयायला सुरवात केली. माझ्या एक्सपर्टने तोपर्यंत घराचे ड्रॉईंग व रिपोर्टही बनविले होता तो तिने माझ्याकउून चेक करून घेतला. त्यात अजून काही आवश्यक यंत्र मी ऍड केले. त्यांचा घराचे प्रवेशद्वार नैऋ त्येत होते ते चुकीचे होते. कीचनचा ओटा पूर्वेला. आईचा बेड ब्रम्हस्थानात तसेच घरात दक्षिणेला, उत्तरेला, पश्चिमेला व एक अग्नेयला असे चार टॉयलेट होते. पश्चिमेचे सोडले तर तीनही टॉयलेट चुकीचे होते व सर्वात  म्हणजे घरातील देवघर ब्रम्हस्थानात होते. आईचा बेड त्यांना मुलीच्या रूममध्ये शिफटकरायला सांगितला, तसेच तिथेच ईशान्येला देवघर शिफट करायला सांगितले. मुलीला वायव्येचा व मुलाला पश्चिमेचा बेडरूम वापरायला सांगितले. माझ्या एक्सपर्टने नंतर वास्तुशास्त्राच्या विनातोडफोड च्या उपाययोजना म्हणजे रेमेडिज कशा कराव्या लागतील ह्याची त्यांना कल्पना द्यायला सुरवात केली. सर्व गोष्टी त्यांनी नीट समजून घेतल्या सांगितल्या प्रमाणे सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांची मनापासून तयारी होती.

अचानकपणे ती मुलगी म्हणाली, “मॅडम तुम्हाला ती स्टोअर रूम बघायची आहे ना’, म्हटले “होय चला आपण  जाऊ या,’ तिथे जाण्यासाठी माझी पूर्व तयारी चालूच होती.  आम्ही स्टोअर रूमकडे जाण्यास निघालो, रूमचा दरवाजा बंद होता,  रूमच्या बाहेरच्या बाजूलाच लाईटचे बटन होते. ते एका दृष्टीने बरेच झाले.  सर्वांना बाहेरच थांबविले मी म्हटले, थांबा मला बघू दया.  दरवाजा उघडला आतमध्ये नजर टाकली खूप मोठी स्टोअर रुम होती, अनेक गोष्टी तिथे ठेवल्या होत्या अतिशय दमट वातावरण व उग्र दर्प तिथे येत होता.  मध्यभागी एक मोठा पियानोही तिथे ठेवला होता, जिवाचा थरकाप  उडवणारे तिथले वातावरण होते. तीन नकारात्मक शक्तिचा वास असल्याचे मला जाणवले. ते बघून अंगावर सरसरून काटा आला अर्थात मला घाबरण्याचे कारण नव्हते, कारण माझ्या सोबत असणाऱ्या भगवान हनुमानाची जाणीव मला होती. खरेतर हनुमानाचे अस्तित्व असल्यावर कुठल्याही बाह्यशक्तीची तिथे राहण्याची हिम्मतच होत नाही,  परंतु मला सर्व गोष्टीचे आकलन व्हावे ह्यासाठी ह्या सर्व गोष्टी मला दिसत होत्या, जे बघायचे ते बघून मी बाहेर आले. त्यांना आतल्या गोष्टीची पूर्ण कल्पना न देता वातावरण खूप निगेटीव्ह आहे एवढेच सांगितले कारण मायलेकी घाबरल्या असत्या.

बाहेर आल्यानंतर त्यांना सांगितले की रूमचा दरवाजा सतत उघडा ठेवा, लाईट रात्रंदिवस चालू ठेवा. रूममध्ये एक खिडकी आहे ती उघडी करून ठेवा, रूमच्या दक्षिण भागात पंचमुखी हनुमानाचा व कालीका मातेचा फोटो लावायला सांगितला व रोज त्या रूममध्ये उद, धूप व कापूर जाळा व शकय झाल्यास गोमूत्र शिंपडा, तसेच स्वामी समर्थांची चांटींग मशीन लावा असे  सांगितले.  पुन्हा आम्ही लिव्हिंगमधल्या सोफयावर बसलो. त्यांनी पुन्हा सांगितले की, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व गोष्टी करण्यास तयार आहोत फक्त आम्हाला ह्या सर्व प्रॉब्लेम मधून लवकरात लवकर सोडवा.’  मुलीची आई म्हणाली की, “माझा मोठा मुलगा अत्यंत गुणी व हुशार असताना त्याची आज काय दशा झाली आहे ते मला पहावत नाही, त्याला लवकर ह्यातून सोडवा. आमच्या अनेक प्रॉपर्टीज अडकलेल्या आहेत त्यासाठी काय करता येईल ते सांगा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी मुलगी तिचे लग्न लवकर होणे फार महत्त्वाचे आहे. त्यावेळेस त्यांना म्हटले तुमच्या घरात पितृदोष असल्यामुळे दोन्ही मुलांची लग्न व्हायला प्रॉब्लेम येत आहे धीर धरा ह्या सर्व गोष्टींमधून  हळूहळू तुमची निश्चित सुटका होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवघर लवकरात  लवकर योग्य ठिकाणी शिफटकरा व तिथे स्वामी समर्थ, दुर्गा देवी व हनुमानाचा फोटो लावा असे सांगितले.

चर्चा करीत असताना अचानकपणे पायाला कसला तरी स्पर्श झाला म्हणून बघितले तर त्यांचा तो बोका माझ्या पायाजवळ बसला होता व प्रेमाने माझ्या पायावरून त्याची शेपटी फिरवत होता त्यावेळेस माझ्या लक्षात आले की संपूर्ण वेळ परिक्षण करताना प्रत्येक वेळेस हा बोका माझ्या मागेमागे फिरत होता. अर्थात तो बोका म्हणजे त्यांच्या घरातील सवार्र्त कर्ता  पुरूषच होता. मी सांगितलेल्या सर्व गेाष्टी जणू काही त्याला पटल्या होत्या, माझ्या बद्‌दल विश्वास वाटत होता म्हणून अति कृतज्ञपणे माझ्याजवळ बसून कृतज्ञता प्रगट करीत होता.

आमचे काम झाले होते तेव्हा आम्ही निघण्यासाठी उठलो, तेव्हा माझी एकसपर्ट दुसऱ्या एक्सपर्टला बोलवायला आत गेली तेव्हा मला त्याची आठवण झाली.  तो एक्सपर्ट बाहेर आला तेव्हा त्याला म्हटले “अरे काय करतोयस बघू तुझे ड्रॉईंग’, त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच  भाव नव्हते.  त्याच्या हातातील वही घेवून पाहीले आणि मला पुन्हा एक धक्का बसला. जवळजवळ चार तास आम्ही त्यांच्या घरात होतो, आणि त्या संपूर्ण वेळेत त्याने वहीत फक्त गोल गोल रेघोट्या काढल्या होत्या.  त्याला घेवून आम्ही त्यंाच्या घराबाहेर पडलो, थोडे चालून आल्यानंतर गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर अर्ध्या तासाने हा भानावर आला त्याला त्याने काय केले हे काहीही आठवत नव्हते.

त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी त्यांच्या रेमेडीज झाल्या. रेमेडीज बसवतांनाही आमच्या टेक्निशियन टिमला विशेष खबरदारी घ्यायला सांगितली होती. ती त्यांनी घेतली व व्यवस्थितपणे सर्व रेमेडीज इनस्टॉल केल्या.  त्यानंतर पंधरा दिवसांनी तिचा मला फोन आला म्हणाली “मॅडम मला एका व्यक्तिने प्रपोज केले आहे काय करू?’ तिला म्हणाले “अजिबात होकार देवू नकोस, तीन चार महीने कुठलेही डीसिजन घेवू नकोस. त्यानंतर तिला एक गुजराथी, एक पंजाबी, एक साउथ इंडियन व महाराष्ट्रीयन असे अशा चार व्यक्ती प्रपोज करतील, त्यातील पंजाबी किंवा महाराष्ट्रीयन या दोन व्यक्तिचांच तू विचार कर असे सांगितले.

त्यानंतर हळूहळू ते कुटुंब सर्व प्रॉब्लेम मधून बाहेर पडले. साधारण नऊ  महिन्यांनी तो बोकाही मृत झाला.  एकंदरीत तिच्या वडिलांनाही मुक्ती मिळाली होती.

सौ. मंजुश्री अहिरराव

वास्तुतज्ञ, रेकीमास्टर

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *