Cart

No products in the cart.

वास्तुपरिक्षणातला माझा अनुभव – I

एकदा एका क्लायंटचे वास्तुपरिक्षण आमच्या वास्तुतज्ञाने केले आणि त्यानंतर वास्तुपरिक्षणाला बोलवणाऱ्या त्या घरातील त्या बाई व सोबत त्यांची बहीण अशा त्या दोघीजणी मला भेटण्यास केबिनमध्ये आल्या. त्या दोघीजणी अत्यंत शांत होत्या, काहीही बोलत नव्हत्या, त्यांनी त्यांच्या घराचा नकाशा व रिपोर्ट माझ्यासमोर ठेवला. त्यांच्या घराच्या नकाशावर नजर टाकल्यानंतर मला काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांच्या घराबद्दल काही प्राथमिक चौकशी करायला मी सुरूवात केली. माझ्या प्रश्नांची उत्तरे देता देता त्या बाई म्हणाल्या. “आमच्या घरात सध्या जे काही चालु आहे तो प्रकार खूप भयानक आहे. मी कसे सहन करते ते माझे मलाच ठाऊ क आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही अशी परिस्थिती आहे. तुमचे एक्सपर्ट आमच्या घरी आल्यानंतर काही गोष्टी मी त्यांना सांगितल्या परंतु सर्व सांगू शकले नाही. तेव्हा मी तुम्हाला भेटण्यास इथे आले.’ त्यांना म्हटले, “तुम्हाला एका बाहय शक्तिचा सध्या खूप त्रास  होतोय हयाची मला कल्पना आहे, तरी नेमका काय त्रास होतो हे सर्व सविस्तरपणे तुम्ही मला सांगा.’

त्यांनी सांगायला सुरूवात केली, त्यांचे घर समुद्रकिनारी कोळी लोकांच्या वसाहतीत होते. अनेक वर्षांपासून ते तिथे राहत होते. खाली व वर असे दुमजली त्यांचे घर होते. हया बाई स्वतः नोकरी करीत होत्या, मिस्टरही कुठे कामाला जात होते. घरात हे दोघे नवरा-बायको, सासूबाई, तरूण मुलगा व मुलगी असे पाचजण रहात होते. एकंदरीत सर्व सुरळीतपणे  चालू होते. परंतु साधारण वर्षभरापासून हयांच्या घराचे वासे फिरले होते. घरात सततचे आजारपण, भांडणे चालू झाले, मिस्टर कुठेही कामाला जात नसे नुसते घरात पडुन रहायचे व बायको कामाला जाते म्हणून विनाकारण तिच्याशी भांडायचे. मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते, सासूबाईंचा आजार वाढत चालला होता. सर्वात महत्चाचे म्हणजे तरूण मुलगी रात्री झोप लागत नाही म्हणून तळमळत होती. हळुहळु तिला डोके दुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. डॉक्टरांकडून औषधे आणली. परंतु फरक पडत नव्हता. झोपेच्या गोळया घेतल्या तरी झोप लागायची नाही. त्यातूनही झोप लागली की मध्येच दचकून उठायची व घाबरायची. नंतर ती सांगायला लागली की रात्री तिच्याजवळ कुणीतरी बसले असते. तिला सांगितले की डोकेदुखीमुळे व झोपेच्या त्रासामुळे तुला असे भास होत आहे. कुणीही तुझ्या बेडवर बसत नाही. झोपताना हे दोघे नवराबायको व म्हातारी आई खालच्या मजल्यावर झोपायचे व मुलगी आणि मुलगा वरच्या मजल्यावर झोपायचे. त्यातही मुलगी बेडवर व मुलगा दरवाज्याजवळ खाली गादी टाकून झोपायचा. पुढे पुढे ती तक्रार करायला लागली की झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी तिच्या अंगावरून हात फिरवल्याची जाणीव तिला होते. त्यासाठी तिला सायकॅ ट्रिककडेही नेले परंतु फरक पडला नाही, तिची तक्र्रार सुरूच होती. दिवसेंदिवस तिची प्रकृती खराब होत चालली होती  रात्रभर झोप नाही, जेवण नाही. रात्री दचकुन उठायची, आरडाओरड करायची, नंतर नंतर सांगायला लागली की रात्री एक माणूस येतो व तिला त्रास देतो तेव्हा तिला तो भास होतोय म्हणून सांगितले, त्यासाठी पुन्हा  सायकॅट्रीकची ट्रीटमेन्ट  सुरू केली, पण फरक पडत नव्हता. अंगारे धुपारे झाले, काही पूजा केल्या परंतु तरीही फरक पडत नव्हता. त्यानंतर हया बाईंनी तिच्यासोबत वर झोपायला सुरवात केली, तरी सर्व प्रकार तोच सुरू होता. पुढे पुढे मो माणूस कसा दिसतो हयाचे वर्णनही करायला तिने सुरवात केली. त्यावेळेस हया बाईंनी ही गोष्ट गंभीरपणे घ्यायला सुरवात केली, त्यासाठी काही तोडगे त्या करू लागल्या. रात्री त्या तिच्याजवळच बेडवर झोपायच्या हळूहळू सर्व गोष्टी शांत झाल्यासारख्या त्यांना वाटल्या.

एक दिवस अचानक त्यांना जाग आली व त्या उठल्या, त्यांनी लाईट लावला, मुलीकडे नजर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ती थोडी हलत आहे, उसासे टाकतेय, मधूनच हसतेय. त्यांनी तिला गदागदा हलवून जागे केले. तेव्हा ती झोपेतून जागी झाल्यासारखी प्रतिक्रिया दयायला लागली म्हणाली तिला झोपेतून का उठवले. हयांनी विचारले तुला काही स्वप्न वगैरे पडले का? तेव्हा ती नाही म्हणाली. त्यावेळेस त्यंाना वाटले की कदाचित तिला काही आठवत नसेल म्हणून त्या झोपी गेल्या. काही दिवसांनी मुलगा तक्रार करायला लागला की, “मध्यरात्री कुणीतरी त्याच्या पायाला लाथ मारतय म्हणून’ तेव्हा विचार केला आतापर्यंत मुलीला त्रास होत होता आता मुलाला होतोय का? त्याला म्हटले “अरे तुलाही काहीतरी भास होतोय बघ,’ आतापर्यंत ताई तक्रार करत होती आता तू करतोस, “काहीही नाही देवाचे नाव घे व झोप काही होणार नाही,’ त्याला चूप केले.

परंतु सर्व गोष्टीतील भयानकता तर त्यांना पुढे जाणवली. एक दिवस अशाच त्या बाई रात्री मुलीजवळ झोपल्या असताना, मध्यरात्री त्यांना कुणीतरी बेडवरून खाली खेचण्याची जाणीव झाली. त्यावेळेस सुरवातीला असे वाटले की आपण बेडवरून पडलो व झोपेत आपल्याला कुणीतरी खेचल्यासारखे उगीचच वाटले असेल. नंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडला व जाणीव झाली की कुणीतरी खसकन खवाटा धरून आपल्याला खाली खाली खेचतय. का प्रकार काही दिवस असाच सुरू होता. नंतर आणखी भितीदायक घटना घडली की मुलाला त्याच्या जागेवरून कु णीतरी उचलून दुसऱ्या बाजूला फेकले. दिसत कु णीही नव्हते परंतु भयानक घटना घडत होत्या.

अनेक प्रकारचे तोडगे चालू होते परंतु काहीही निष्पन्न होत नव्हते. त्यानंतर दोनचार दिवसांनी त्यांनी जो भयानक प्रकार बघितला तो सहन न होण्यासारखा होता. असले प्रकार होतात म्हणून त्या बाई रात्रभर खोलीतला लाईट चालूच ठेवायच्या. असेच नेहमीप्रमाणे मध्यरात्री त्यांना बेडवरून खाली खेचण्यात आले, तेव्हा त्या सुन्न होऊ न पाच मिनिटे तशाच बसून राहिल्या त्यानंतर त्याचे अचानक मुलीकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी जे दृष्य बघितले ते बघून त्यांची पाचावर धारण बसली. मुलगी झोपली होती व एक पुरूष तिच्या जवळ बसला होता. व तिच्या अंगावरून हात फिरवत होता. तो प्रकार बघून मति गुंग झाली होती, क्षणात तो पुरूष तिथून नाहीसा झाला. मुलगी झोपली होती परंतु तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर वेगळीच गोष्ट लक्षात आली की तिचे डोळे जरी बंद होते तरी तिचे शरीर त्या अदृष्य शक्तिला प्रतिसाद देतेय, जणु काही घ्या सर्व गोष्टी तिला सुखद आनंद देत होत्या. काय करावे काही सुचत नव्हते. उठून उभे राहीले व मुलीला गदागदा हलवून जागे केले. ती उठून बसली व काहीही माहीत नसल्यासारखी प्रतिक्रिया व्यक्त केली, म्हणाली का ग काय झालेय, मला का उठवलेस. तिला म्हटले अग काय करत होतीस? ती म्हणाली, “मी तर झोपली होती.’ एकंदरीत तिच्याशी बोलताना लक्षात आले की तिला हया कुठल्याही प्रकाराची काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे तिला त्याबद्दल काहीही सांगितले नाही.

दुसऱ्या दिवशी जाहीर केले की वरच्या मजल्यावर कुणीही झोपायचे नाही, आपण सर्वजण खालीच झोपू या तेव्हा मुलगी ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली, “आता कुठे माझा झोपेचा त्रास कमी झालाय! पुन्हा म्हणून का हा बदल? मला खाली झोपायला आवडत नाही. शिवाय बाबांचे मोठयाने घोरणे व आजीच्या खोकल्याने माझी झोप खराब होते, मी वरच झोपणार.’ तिला दरडावून सांगितले शहाणपणा करू नकोस, सांगितले तेवढे ऐकायचे. त्या रात्री सर्वजण खाली झोपलो, मला झोप येेत नव्हती म्हणून मी जागेच होते, मुलगीही झोपली नव्हती. दुसऱ्या रात्रीही मुलगी ऐकत नव्हती तरी तिच्या सकट सर्वजण खाली झोपलो. मध्यरात्री अचानक जाग आली बघितले तर बाजूला मुलगी नव्हती. विचार केला बाथरूमला गेली की काय? बघितले तर तिथे नव्हती. पुढच्याच क्षणी अंगावर भीतीचा काटा आला म्हणजे ही वर गेली की काय?  धावतच वर गेले. तिच अदृष्य शक्ति तिथे होती व क्षणात नाहीशी झाली. मुलगी बेडवर झोपली होती व त्या शक्तिला प्रतिसाद देत होती. तिला दोन थोबाडीत देऊ न उठविले, खेचतच खाली आणले, विचारले, “नाही सांगितले तरीही वर का गेलीस? ती म्हणाली “मी कुठे वर गेली तूच मला घेऊ न गेलीस.’ काय बोलावे काही सूचनासे झाले पायात गोळे आले होते. अंग थरथरायला लागले. त्यानंतर हा प्रकार रोजचाच झाला. शेवटी मी तिच्यासोबत वरच झोपायला सुरूवात केली. रात्रभर लाईट लावून पोथी वाचत बसायची. शेवटी मीही किती दिवस जागे रहाणार? थकल्यामुळे केव्हा झोप यायची काही कळायचे नाही. मी झोपल्यानंतर रोजचा प्रकार घडत असेल ही कल्पनाही मला आली. पण माझा नाईलाज होतोय. सकाळी सर्व कामे आटोपून, ऑफीसला जाणे, घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक, इतर कामे, नवऱ्याची कटकट, जीव खूप थकून गेलाय. शिवाय सर्व गोष्टी मीच सहन करायच्या. नवऱ्याला काहीही सांगितले तरी तुला वेड लागलेय असे म्हणतो व चक्क दुर्लक्ष करतो. बरे बाहेर इतरांनाही कोणाला सांगू शकत नाही, मुलीच्या पुढील आयुष्याचा प्रश्न आहे. फक्त माझ्या बहिणींना सर्व गोष्टीची कल्पना दिली आहे, त्याही आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत पण कुठुनच यश मिळत नाही. त्यात मुलगी त्याला का प्रतिसाद देते तेही समजत नाही. हल्ली तर मला  तिचाच राग यायला लागलाय, मॅडम, काहीतरी करा यातून मला सोडवा.

सर्व प्रकार ऐकून माझीच बुद्धी काम करेनाशी झाली. मनात विचार येत होते, आजपर्यंत आपण अनेक केसेस हाताळल्या, अनेक अदृष्य शक्ती बघितल्या. वेगवेगळया प्रकाराने इतरांना या शक्तिंना त्रास देतांनाही बघितले. परंतु, अशा शक्तिीची एका जिवंत तरूण मुलींशी अशा प्रकारची वर्तणूक? आणि भरीत भर म्हणजे तिचा हया शक्तिला मिळणारा प्रतिसाद.अर्थात मला थांबून चालणार नव्हते, माझी बुद्धी नेहमीप्रमाणे काम करण्यास तत्पर झाली. त्यांना म्हटले “काय हो त्या शक्तिला तुम्ही एकटयांनीच बघितले की आणखीन कुणी बघितले?’ त्या म्हणाल्या मी व माझ्या मुलानेही बघितले आहे. त्यांना म्हटले, त्या शक्तिने गर्द चॉकलेटी रंगाची पॅन्ट व लाल रंगाचा चौकटीचा शर्ट असे कपडे घातलेेले आहेत, तो तीस ते बत्तीस वर्षे वयाचा तरूण आहे, रंग गोरा, केस कुरळे, मध्यम उंचीचा, एकंदरीत दिसावयास स्मार्ट असा आहे. त्या म्हणाल्या होय. मॅडम तुम्ही म्हणालात अगदी तश्या तंतोतंत वर्णनाचीच व्यक्ती आहे. त्यानंतर माझ्या डाऊझिंगच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या टेस्ट घ्यायला सुरूवात केली. त्यातून काही गोष्टी निष्पन्न झाल्या. एकतर ही शक्ती समुद्रातून आली होती. तीन वर्षापूर्वी  ह्या तरूणाचा खून झाला होता व त्याचे प्रेत समुद्रात टाकण्यात आले होते. तरूण वय असल्यामुळे लैंगिक भावना तीव्र स्वरूपाच्या होत्या, त्यामुळे मृत्यूनंतरही त्या भावना तशाच अबाधित राहिल्या व त्या अतृप्त इच्छा अशाप्रकारे पूर्ण केल्या जात होत्या. शक्यतो अशा शक्ती दृष्टीस पडत नाही परंतु एखाद्याच्या कुठल्याही भावना तीव्र स्वरूपाच्या असतील तर अशा शक्ती कधी कधी दृष्य स्वरूपात दिसू शकतात. ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या मी त्यांना सांगितल्या व त्यांना धीर देत म्हटले, “काळजी करू नका. आपण निश्चितच ह्यातून बाहेर पडू. वास्तुशास्त्राच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल.’

त्यानंतर सर्वप्रथम मी त्यांच्या घराच्या नकाशाचा विचार केला. त्यांच्या मागच्या बाजूला पश्चिमेला संपूर्ण मोठा असा समुद्र होता. आग्नेय दिशेचा मुख्य दरवाजा, उत्तरेला किचन, पश्चिमेला, टॉयलेट बाथरूम तसेच नैऋत्येला देवघर होते. दक्षिण दिशेत ह्या बाईंचे मिस्टर झोपत असे तिथेच बाजूला ह्या बाई व वायव्य दिशेत म्हातारी आई झोपत असे. समोरच्या बाजूला व मागच्या बाजूला थोडी थोडी मोकळी जागा होती. मागच्या बाजूला मोठी मोठी नारळाची झाडे होती पूर्व दिशेत घरातूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी छोटासा जिना होता. वर दोन खोल्या होत्या. तिथे दक्षिण भागात मुलगा झोपत असे व उत्तरेच्या खोलीत मुलीचा पलंग होता. घराचा नकाशा बघितल्यानंतर त्यांना वास्तुशास्त्राप्रमाणे बदल करण्यास सांगितले, तसे त्याप्रमाणे आमच्या वास्तू एक्सपर्टने त्यांना योग्य त्या रचनेचा नकाशा दिलाच होता. वास्तुशास्त्राप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे देवघर त्यांना ईशान्य दिशेत घेण्यास सांगितले. नैऋत्येला ह्या दोघंाना झोपण्यास सांगितले. वायव्य दिशेत मुलाला व मुलीला तुमच्या जवळच खाली झोपवा, वर कुणीही झोपू नका असे सांगितले. तसेच देवघरात कुलदेवी, स्वामी समर्थ व पंचमुखी हनुमानाचा फोटो लावा व स्वामी समर्थांची चॅंटींग मशीन (नामस्मरणाची) सतत चालू ठेवा असे सांगितले. त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना देवाची तांब्याची सर्व यंत्रे, क्रिस्टल पिरॅमिडस्‌, सर्वांना गळ्यात घालण्यासाठी क्रिस्टल पेन्सिल अशा रेेमेडीज लिहून दिल्या व लवकरात लवकर सर्व उपाययोजना करून घ्या असे सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या, “मॅडम तुम्ही जे काय सांगाल त्या सर्व गोष्टी लगेचच करून घेते. काहीही करून माझ्या मुलीची त्या शक्तीपासून सुटका करा.’ त्यांना म्हटले, “धीर धरा. स्वामी समर्थावर श्रध्दा ठेवा. तसेच मुलीचा राग करू नका त्यात तिचा काय दोष? तिच्या बाबतीत काय होतेय ह्याची तिला कल्पनाही नाहीय. तिच्या प्रतिसादाबद्‌दल म्हणाल तर तिचे सबकॉशन्स माईंड हे सर्व करतेय. तिचा त्याच्यात दोष नाही. तिला तुम्हीच समजून घ्या.’ असे सांगितले.

त्यानंतर दोन ते तीन दिवसांनीच त्यांच्या घराच्या रेमेडीज म्हणजे बिना तोडफोडच्या उपाययोजना त्यांच्या घरी करून घेतल्या. पाच सहा दिवसांनी ह्या बाईंचा मला फोन आला म्हणाल्या, “मॅडम आता तर परिस्थिती खूपच बिकट झालीय. घरातले वातावरण खूप भितीदायक झालेय. मुलगी खाली झोपायला अजिबात तयार नाही, झोपली तरी मध्येच उठून वर जाते. अडवायला गेले तर हिंसक बनते. शेवटी आम्ही तिघे पुन्हा वरच झोपायला गेलो. मध्यरात्री ती शक्ती येते, मुलाला जोरदार लाथ मारून पुढे येते, मला पलंगावरून  ढकलून दिले जाते. मुलीच्या गळ्यातील क्रिस्टल पेन्सिलचा धागा तोडून दोऱ्यासकट खाली फेकून दिला जातो व तो आपला कार्यभाग साधतो. मुलगी त्याला प्रतिसाद देतेच आहे. मॅडम असे झाले तर माझ्या मुलीचे काय होईल? ‘ दिवसभर ही नुसती पडून असते, जेवत नाही, कॉलेजला जात नाही. त्यांना म्हटले ठीक आहे. “तुम्ही धीर धरा काय करता येईल ते मी पहाते.’ त्यांना धीर धरा म्हणून सांगितले परंतु माझी कसोटी सुरू झाली. पुन्हा डाऊ झिंग केले त्यातून काय करायचे माझ्या लक्षात आले ज्याप्रमाणे घराच्या खालच्या मजल्यावर यंत्राच्या उपाययोजना केल्या होत्या त्याप्रमाणे वरच्या मजल्यावरही उपाययोजना कराव्या लागतील तसेच वरच्या मजल्यावरही ईशान्य दिशेत कुलदेवी, स्वामी समर्थ, पंचमुखी हनुमान तसेच कालीका माता असे फोटो व स्वामींची चॅंटींग मशीन वर लावण्यास सांगितले. व सर्वांना खालीच झोपण्यास सांगितले. हे सर्व लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हया बाईंचा फोन, “मॅडम हे सर्व लावून घेतले, सर्वजण खालीच झोपलो, मध्यरात्री वरच्या मजल्यावर हैदोस सुरू झाला दाणदाण पावले टाकल्याचा आवाज, वस्तू इकडे तिकडे फेकल्याचा आवाज येत होते रात्रभर भीती वाटत होती की तो खाली येतोय की काय?’ त्यांना म्हटले काळजी करू नका खाली येण्याची हिम्मत तो करणार नाही, वरची चॅंटीग मशीन मात्र मोठया आवाजात सुरू ठेवा असे सांगितले.

त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा फोन आला. म्हणाल्या, नंतर चार पाच दिवसांनी हळूहळू बऱ्यापैकी शांत झालेले आहे. आम्ही सर्व खालीच झोपतोय परंतु वर जाण्याची आमची हिम्मत होत नाहीय. त्यांना म्हटले घाबरू नका आता तो काही करणार नाही, आपण खूपच अशा मजबूत उपाययोजना (स्ट्रॉग रेमेडीज) केलेल्या आहेत. दिवसा वर जा सर्व खिडक्या उघडा तिथल्या फोटोची पूजा करा, दिवा, अगरबत्ती लावा. व सर्वात महत्वाचे म्हणजे ही व्यक्ती म्हणजे अडकलेला अतृप्त आत्मा आहे तेव्हा त्याच्या सुटकेसाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. त्यासाठी सर्व प्रथम सकाळी बारा ते साडेबाराच्या दरम्यान दक्षिण दिशेच्या खिडकीत त्याच्यासाठी  बिना मिठाचा व बिना साखरेचा दही भात ठेवा व पितरांची प्रार्थना म्हणा. त्यासाठी त्यांना पितरांची प्रार्थना सांगितली. त्यानंतर घरात काही पूजा व हवन करावे लागतील हयाची त्यांना कल्पना दिली. मी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे केल्या. खाली व वर दोन्ही ठिकाणी पूजा, तसेच रोज दहीभात ठेवला. पुढे काही दिवसात लगेचच सांगितल्या प्रमाणे पूजा व हवन केले.

त्यानंतर साधारण तीन आठवडयांनी त्या व त्यांच्या इतर बहिणी, मला भेटायला आल्या हया बाईंना एकूण पाच बहिणी होत्या म्हणजे सर्व मिळून सहाजणी त्या सर्वजणी खास मला भेटायला व धन्यवाद देण्यास आल्या होत्या. म्हणाल्या ज्या गोष्टीची आम्ही पूर्ण अशा सोडून दिली होती. त्या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत झाल्या आहे, घरातला त्रास पूर्णपणे नाहीसा झालाय, मुलगी व्यवस्थितपणे खाते पिते कॉलेजला जाते. घरात कु ठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. उलट पूर्वीपेक्षाही घरातले वातावरण खूपच प्रसन्न वाटतेय. मॅडम हे सर्व तुमच्यामुळे झालेय त्यासाठीच तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आलोय. त्यांना म्हटले धन्यवाद दयायचे ते त्या देवाला, देवीला, स्वामींना, हनुमानाला व कालिका मातेला दया. मी कोण आहे? मी फक्त माध्यम आहे, तेव्हा आभार मानायचे ते त्यांचे माना. आयुष्यभर त्यांची सेवा करा पूजा करा व त्यांचे आशिर्वाद प्राप्त करा.

पुढे त्या सर्व बहिणींच्या घरीही वास्तुशास्त्राच्या उपाययोजना झाल्या त्यानंतर त्यांच्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी अशा कितीतरी जणांनी आमच्याकडून वास्तुशास्त्र करून घेेतले.

एक गोष्ट लक्षात आली की वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कितीही कठीण समस्या असेल तरीही ती समस्या मार्गी लागू शकते. परंतु हया सर्व गोष्टीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या परमेश्वराचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असणे अत्यंत गरजेचे आहे.

 “जय श्री स्वामी समर्थ’

सौ. मंजुश्री अहिरराव

वास्तुतज्ञ, रेकीमास्टर

Comments

 1. sushma

  hi mam,
  i am Mrs.Sushma Michel, i am u r student (Sunday batch)now, i am studying vastushastra.mam i want to learn Dowsing course.
  and thanks to u and sir. u r doing very good job.
  regds
  sushma.

  March 15, 2012 Reply

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *