Cart

No products in the cart.

मानवाला लाभदायी: विज्ञान अध्यात्म वास्तुशास्त्र

मुळात भारतीय वास्तुशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारतीय वेद भूतलावरील सर्वात प्राचीन साहित्य आणि त्यात आपणास “स्थापत्यवेद’ उल्लेख सापडतो. देवादिकांचा भवननिर्माता विश्वकर्मा आणि असुरांचा भवननिर्माता मयासुर यांना या शास्त्राचे जनक मानले जाते. हजारो वर्षांपासून शेकडो ग्रंथामध्ये या शास्त्रांबद्‌‌‌दल विस्तृत प्रमाणात लेखन व संशोधन नमुद आहे. मानवाला निसर्गासोबत एकरूप करणे व निसर्गशक्तीचा अविष्कार प्राप्त करून जीवन समृध्द करणे हेच वास्तुशास्त्राचे उदि्‌दष्टय आहे. विज्ञान आणि वास्तुशास्त्र या विषयाचा उहापोह करायचा झाल्यास  हजारो पाने लेखन आणि कित्येक तास मौखिक विश्लेषण करता येते.

निसर्ग वास्तु व मानवी शरीर सर्व पंचमहाभूतांमधून साकारतात आणि त्यातच विलय पावतात. या तिघांमधील संतुलन म्हणजे वास्तुशास्त्र.

सकाळची सुर्य (अतिनील) किरणे वास्तुला आणि मानवाला पोषक तर दुपारची (ताम्र) किरणे घातक.

वायुवीजनाच्या माध्यमातून उष्ण वारे बाहेर काढणे. स्वच्छ शुध्द वायु घरात खेळता ठेवणे, प्रसन्नता वाढ विणे.

प्राचीन वास्तुशास्त्र आणि आधुनिक जीवनपध्दती यांचा उत्कृष्ट ताळमेळ अत्यंत  उत्कृष्टपणे घालता येतो. अगदी फ्लॅट पध्दतींच्या घरांमध्ये सुध्दा योग्य रित्या घालता येतो. गरज आहे ती पूर्वग्रहदुषित न ठेवता त्या विषयाचे अध्ययन करून स्वीकारण्याची, नवीन प्रयोगशीलतेची .

जमिनीची पोत, चढ-उतार, आकारातील वाढ अथवा कुंठीत होणे खोदकाम तसेच बांधकाम साहित्याची चाचणी, निवड व वापरण्याची पध्दत, दारे-खिडक्या, जिन्याच्या पायऱ्यांपासुन, अंतर्गत रचना, रंगसंगती या विषयांवर सखोल मार्गदर्शन संशोधन जगात सर्वप्रथम केले ते आमच्या ॠषीमुनींनी तेच वास्तुशास्त्र आधुनिक घरातील पाणी शुध्दीकरण यंत्र व प्राचीन वास्तुशास्त्रानुसार सुचित केली जाणारी इशान्येतील भूगर्भांतर्गत पाण्याची टाकी यामधील साधर्म्य विज्ञानाचा संबंध प्रस्थापित करतो.

भारतात सध्या गाजावाजा होत असलेली ग्रीन हाऊस अमेरिकन प्रणाली पाश्चिमात्य पध्दतीचे शिक्षण घेतलेल्या विज्ञानवादयंनी डोक्यावर घेतली आहे. परंतु त्यांना हे माहित नाही की वास्तु आराखडयांबाबतचे अमेरिका पुरस्कृत ही सर्व तत्व वास्तुशास्त्रातील ग्रथांमध्ये हजारो वर्षांपासुन नमुद केलेली आहेत.

नासामध्ये होत असलेला वेदाभ्यास, अमेरिकेतील अनेक मेटाफिजीकल विदयापीठे, जर्मनीतील बिल्डिंग बायोलॉजी, फ्रान्समधील बायोएनर्जी, हॉवर्डमधील गीता व श्रीकृष्ण नीती बाबतचे संशोधन, ऑक्सफर्ड-केंब्रिज मध्ये भारतीय प्राचीन शास्त्रांचे चालू असणारे संशोधन हेच सिध्द करते की या शास्त्रांचे चालू शास्त्रांमध्ये तथ्य आहे.

भारतीय योग विज्ञान आयुर्वेद, शून्याचा शोध व त्यातून विकसित झालेली गणिती-विज्ञान पध्दती अशा शेकडो हजारो गोष्टींना जेव्हा युरोप-अमेरिकेत मान्यता  प्राप्त होते तेव्हाच आमच्या कडील विज्ञानवादी तिचा स्वीकार करतात यात गुलामी प्रवृत्तीचे प्रतिबिंब व मेकॉलेनी भारतात आणलेल्या शिक्षण पध्दतीचा दोष मानायचा, की संकुचित दुराग्रही वृत्ती मानायची ?

प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रात अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीचे सुरेल संतुलन राखण्यात आले आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट अथवा घटना विज्ञानाच्या कसोटीवर सिध्द करणे शक्य आहे का ?  असते तर आजही अनेक आजार औषधी उपायांद्वारे बरे करता येतातच असे नाही अनेक विश्व विनाशकारी गोष्टीच विज्ञानाने जन्माला घातल्या तरीसुध्दा विज्ञान आवश्यक आहे.

विज्ञानाच्या माध्यमातून माणसाला भौतिक सुख प्राप्त करता येते परंतु खरे समाधान, मनःशांती ही केवळ अध्यात्माच्या माध्यमातूनच मिळते. मानवी जीवनाचे पूर्णत्व विज्ञान आणि अध्यात्माच्या सुरेल संगमातूनच साध्य होऊ  शकते आणि त्यासाठीच वास्तुशास्त्रासारखी  शास्त्र मानवासाठी उपकारक आहेत.

अतिप्राचीन काळापासुन म्हणजे अगदी भगवान राम आणि श्रीकृष्णाला त्रास देणाऱ्या अनिष्ठ प्रवृत्ती त्यावेळच्या समाजात सुध्दा होत्या उदा. मंथरा, पुतना, कुब्जा, परीट इ. तर समस्त संतांना सुध्दा त्याच्या प्रचलित काळातील कर्मठांनी त्रास दिला. हा त्रास जर देवादिकांना, संताना टाळता आला नाही तर सर्व सामान्यांच्या नशिबी असा त्रास येणे काही विशेष नाही. वास्तुशास्त्र या विषयाची प्राचीनता, विज्ञानाचा असलेला आधार आणि जगभर या विषयात चालू असलेले संशोधन या विषयाची ओळख अतिशय संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अन्यथा अनेक तासांचे विवेचन आणि शेकडो पानांचे विश्लेषणसुद्धा या विषयाला कमी पडू शकते.

मागील 8 ते 10 वर्षात आपल्या भारत देशात चार वेळा विविध उच्च न्यायालये आणि दोन वेळा सर्वोच्च न्यायालयात वास्तु, ज्योतिष तथा अन्य प्राचीन शास्त्रांना आव्हान देण्यात आले, त्यांना अवैज्ञानिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच ड्रग्ज अँड मॅजिकल रेमेडिज ऍक्टच्या अंतर्गत अनेक आक्षेप होऊ न शिक्षा करण्याबाबत अनेक उथळ आणि केविलवाणे प्रयत्न केले गेले परंतु प्रत्येक केसमध्ये संबधित राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने अतिशय स्पष्ट आणि ठोस शब्दात या शास्त्राची प्राचीनता, अस्तित्व व जनमानस तथा सरकारला हे विषय पूर्णपणे मान्य असल्याचे तसेच या विषयाबाबत कोणताही आक्षेप नसल्याचे घोषित केले आहे.  या विषयांच्या प्रचलीत सेवा पध्दती बद्‌दल कोणताही आक्षेप नसल्याचे मान्य केले आहे. एवढेच नाही तर अशा प्रकारची प्रतिज्ञापत्रेसुध्दा सादर केली आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने 2004 मधील 3478 या केसच्या निर्णयपत्रात स्पष्टपणे या प्राचीन शास्त्रांना विज्ञान मानण्यास हरकत नाही असा निर्वाळा देऊ न यु.जी.सी द्वारे विदयापीठ अभ्यासक्रमात या विषयांचे अध्ययन समाविष्ट करण्याबाबत सूचना सुध्दा दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर यापैकी काहींनी शिक्षणाचे भगवीकरण असा आरोप सुध्दा केला ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी करून तथाकथित विज्ञानवादयांच्या धर्मद्वेष्टेपणाला सुध्दा चपराक दिली. या सर्व न्यायालयीन लढयातून एक महत्त्वपूर्ण मुद्‌दा सुध्दा निर्णयाप्रत आला आणि तो म्हणजे साक्षात न्यायमुर्तीनी असे नमूद केले की, शास्त्र ही अविरत प्रगत होत असतात आणि कुठल्याही शास्त्राला त्यातील तथ्य सिध्द करण्यासाठी सखोल अभ्यास आणि संशोधनाची योग्य संधी दिलीच पाहिजे. एकतर्फी गळचेपी करून चालणार नाही.

आजपर्यंत या प्राचीन शास्त्रांमुळे लाखो-करोडो जनतेचा फायदाच झालेला आहे. नुकसान मुळीच झालेले नाही. हजारो वर्षांपासुन वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहेत. सदर शास्त्र जिवंत आहेत आणि उत्तरोत्तर या अधिक दृढ  होत आहे. धाकदपटशा, दहशत आणि फसवणूक करणाऱ्या गोष्टी काळाच्या ओघात लोप पावतात परंतु ही शास्त्रे सोन्यासारखी आधिकाधिक झळाळी प्राप्त करीत हे त्रिवार सत्य आहे.

डॉ. रविराज अहिरराव

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *