Cart

No products in the cart.

प्राचीन शास्त्राचा विजय

अति प्राचीन काळापासून सर्व चांगल्या गोष्टी. संकल्पना व  व्यक्तींना. सतत एकापाठोपाठ एक दिव्य व संकटांना सामोरे जावे लागले. भगवान श्रीरामचंद्राला चौदा वर्षे वनवासाला सामोरे जावे लागले. सीतेला अग्निदिव्य पार पाडावे लागले. भगवान श्रीकृष्णाला आपल्या डोळयादेखत यादव  कुळातील यादवी पहावी लागली. आपण निर्माण केलेली द्वारका बुडवावी लागली. प्रत्येक संतांचे आयुष्य अत्यंत खडतर व सामाजिक अवहेलना या गोष्टींनी भरलेले आढळते. याच पद्धतीने प्राचीन भारतीय शास्त्रांपैकी ज्योतीष, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या शास्त्राना एकीकडे तथाकथीत विज्ञान वादयांच्या टीकेला सामोरे जावे लागत असते. या सर्व गोष्टींचा एक भाग म्हणजे या शास्त्रांना आजपर्यंत तीनवेळा न्यायालयीन सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागले आणि पुन्हा एकदा सत्याचाच विजय होतो हे सिद्ध झाले. अशाच आणखी एका अग्निदिव्यातून प्राचीन भारतीयशास्त्र तावून सुलाखुन शृद्ध सोन्याप्रमाणे आपली चमक अधिक प्रखर करून बाहेर आली आहेत.

——————————————————————————————–

नुकतेच 3 फेब्रुवारी 11 रोजी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश मा. मोहित शहा व मा. न्या. एस जे वझीफदार यांनी जनहित याचिका 3/2010 पूर्णपणे फेटाळून प्राचीन भारतीय शास्त्रांच्या अस्तित्व व महत्वाला मान्यता दिली. या खटल्यात केंद्रशासन, महाराष्ट्र शासन, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त मुंबई व अन्य काही ज्योतीषी, वास्तुशास्त्र  तज्ञ ज्यात मी एक होतो. प्रतिवादी होतो. या केसच्या निमीत्ताने एका अत्यंत अपमानजनक गोष्टीला सामोरे जावे लागले. ज्यात अनेक वर्षे या विषयाचा सखोल अभ्यास करून प्रॅक्टीस करीत असलेल्या आम्हा प्रथितयश व्यक्तींची तुलना भोंदूबाबासोबत करून सब घोडे बारा टक्के अशी परिस्थिती निर्माण केली. परंतु शास्त्राच्या सिद्धतेसाठी सर्व सहन करून करण्यात आलेले सर्व आरोपांचे अत्यंत शास्त्रोक्त न्यायोचित व प्राचीन ग्रंथांच्या संदर्भासहित समर्पक उत्तर देऊ न भारतीय शास्त्रांची बाजू आमचे वकील श्री महेश आगाशे यांनी उत्कृष्ट मांडून ही केस फेटाळून लावण्यात यश मिळविले. याबाबत कायदेशीर लढाईचे वर्णन विस्तृत स्वरूपात याच मासिकात अँड महेश आगाशे  यांनी दिले. या याचिकेत अशी मागणी होती की वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अन्य तत्सम भारतीय प्राचीन विज्ञानशाखा अवैज्ञानिक असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात यावी. तसेच वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अन्य तत्सम भारतीय प्राचीन विज्ञानशाखांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य तसेच अन्य तक्रारी दूर करणाऱ्या या मंडळींजवळ कोणतीही आरोग्यविषयक प्रमाणपत्रे नसल्यामुळे या लोकांवर ड्रग्ज आणि मॅजिकल रेमेडीज कायद्याच्या (1954) अंतर्गत कारवाई करण्यात यावी व बंदी घालण्यात यावी. त्यांना आपल्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासही प्रतिबंध करण्यात यावा.

या केसच्या सुनावणी दरम्यान भारत सरकार तर्फे वारंवार अत्यंत आग्रहपूर्वक सांगण्यात आले की भारत सरकारला या सर्व शास्त्राबद्दल आदर व मान्यता आहे तसेच यात कोणतीही गोष्ट आक्षेपार्ह वाटत नाही. तसेच यावर बंदी घालणे मुळीच आवश्यक वाटत नाही.

          त्याचवेळी भारत सरकार ड्रग कंट्रोलर व महाराष्ट्र शासनांतर्गत फूड अँड ड्रग ऍडमिनीस्ट्रेशनद्वारे नमूद करण्यात आले की ड्रग्ज ऍंड मॅजिकल रेमिडीज ऍक्ट 1954 च्या अंतर्गत त्यांच्या विभागातर्फे  योग्य ती कारवाई केली जात असून शासन त्याबाबत पूर्णपणे समाधानी आहे. तसेच या कायदयांतर्गत वास्तुशास्त्र व ज्योतीषशास्त्राबाबत कोणतीही गोष्ट आक्षेपार्ह वाटत नसल्यामुळे या शास्त्रात काम करणारे तज्ञ व त्यांच्या जाहीराती याबाबत सरकारला काहीच आक्षेप नाही. आक्षेपार्ह असल्यास कारवाई केली जाते. परंतु बंदी घालण्याची आवश्यकता नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मा. मुख्य न्यायमूर्तीनी ही केस फेटाळतांना जे मुद्दे उपस्थित केले त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निवाडयाचा संदर्भ देऊ न सर्वोच्च न्यायालयास ज्या गोष्टी मान्य आहे. त्या गोष्टींना आमचे अनुमोदनच असते.

या सर्व न्यायालयीन लढायांनंतर मला तथाकथित विज्ञानवादी व आम जनतेसमोर काही गोष्टी मांडणे आवश्यक आहे.

 विज्ञानाचा आधार घेऊ न भगवीकरणाला विरोध करण्याचा छूपा अजेंडा राबविणाऱ्यांनी आता जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. आजपर्यंत जेव्हा कुठे वास्तु-दोष व तत्सम शास्त्रांविरूद्ध ते अशास्त्रीय आहे अशी ओरड करतांना शिक्षणाचे भगवीकरण व हिंदूच्या धार्मिक प्रथा-परंपरांना खुळचट-अशास्त्रीय-अंधश्रद्धा अशी अवेहलना करणारे तथाकथित आजपयर्र्ंत कधीतरी अन्य धर्मातील प्रथांविरूद्ध ब्र शब्द काढण्याची हिम्मत का दाखवित नाही?

 विज्ञानाचा पुळका असणारे हे तथाकथित बाजारात उपलब्ध असलेल्या व भयानक साईड इफेक्टस असलेल्या ऍलोपॅथी औषधाविरूद्ध तसेच मोबाईल फोन मानवाला घातक आहे. आण्विक शस्त्रांनी मानवतेचा केवढा मोठा घात केला आहे या विरूद्ध आवाज काढण्याची हिम्मत का दाखवू शकत नाही?

लाखो रूपये खर्च करून एखाद्या रूग्णालयात शस्त्रक्रिया केली जाते, त्यावेळी वैद्यक विज्ञान गॅरंटी देते का? वैद्यकशास्त्र हे सिद्धस्वरूपातले विज्ञान आहे तर या ठिकाणी शस्त्रक्रियेला अनुमती देत आहोत असे का लिहून घेतले जाते? या बद्दल तथाकथित विज्ञानवाद्यांनी (छुप्या भगवा विरोधकांनी) स्पष्टीकरण करावे.

सुप्रिम कोर्टाने 2004 साली ज्योतिषशास्त्र विषयाला विद्यापीठ अभ्यासक्रमाला आणण्याची शिफारस केली आहे. सोबत उल्लेख केला आहे की, जोपर्यंत एखाद्या विषयात सखोल अभ्यास व संशोधनास वाव दिला पाहिजे. म्हणजेच सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे तरीसुद्धा तथाकथित विज्ञानवादी या विषयांना अभ्यासक्रमात सुद्धा आणू नये यासाठी आटापिटा करीत आहे म्हणजे मूल जन्माला येण्याअगोदर आईच्या पोटातच त्याला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वास्तुशास्त्र एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फाऊं ण्डेशनने दि. 7 फेब्रुवारी 2009 रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे निवेदन देऊ न वास्तुशास्त्रासह सर्व प्राचीन विद्यांचा सखोल शिस्तबद्ध अभ्यास व संशोधनासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापण्यास मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून हा प्रस्ताव मानव संसाधन मंत्रालय व युनिव्हर्सीटी ग्रॅट कमिशन यांच्यात निर्णया अभावी प्रलंबित आहे. त्यास भारत सरकारने त्वरित मान्यता द्यावी ही आग्रहाची मागणी.

आज परदेशात आमच्या या प्राचीन शास्त्रांवर विविध प्रकारे संशोधन व अभ्यास चालू आहे. उदा. नासामध्ये वेदांवर  खास संशोधन विभाग तर जगप्रसिद्ध हॉवर्ड विदयापीठात गीता व भगवान श्रीकृष्णाची व्यवस्थापकीय मूल्य यावर अभ्यासक्रम

चालू करण्यात आला आहे तर फ्रांन्समध्ये बायोएनर्जी बायोएनव्हायरमेंट. जर्मनीमधील बिल्डींग बायोलॉजी अमेरिकेतील  एनर्जी ऑडीट किंवा काही वर्षांपासून भारतात सर्वसामान्य  मिळवणारे ग्रीन बिल्डींग संकल्पना यातील घर बांधणी बाबतची सर्व मार्गदर्शक तत्व म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राची मूलतत्वे आहेत. भारतीय वास्तुतज्ञ गृहप्रकल्प वास्तुशास्त्रानुसार बांधा यासाठी अनेक वर्षांपासून कंठशोष करीत असतात परंतु अमेरिकेतून भारतीय वास्तुशास्त्राची मूलतत्वे ग्रीन बिल्डींग अथवा लीड्‌स (ङशशवी) या गोडंस नावाखाली येतात आणि हे तथाकथित विज्ञानवादी अगदी डोळे झाकून स्वीकारतात. त्या गोष्टीला विज्ञाननिष्ठा म्हणायची की गुलामी प्रवृत्ती ! निर्णय आपण सुज्ञ वाचकांनी करावा.

विज्ञान जेवढे उपकारक आहे त्यापेक्षा कित्येक पटीनी ते घातक आहे. ऍलोपथी औषधांमधील साईड इफेक्ट्‌सची तीव्रता व महाभयानकता, मोबाईल फोनमुळे होणारा त्रास, आधुनिक विज्ञानामुळे निर्माण होणारे त्रास. आधुनिक विज्ञानामुळे निर्माण होणारे ग्लोबल वॉर्मिग. अव्वस्त्रांचा विनाशकारी धोका. अशा अनेक गोष्टी ज्यामुळे सुविधा पण मिळाल्या पण धोके आणि आपत्तीसुद्धा. त्यातुलनेत प्राचीन वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्रमुळे कुणाचे नुकसान मुळीच होत नाही.

विज्ञानामुळे मानवाला भौतीक सुख प्राप्त होत पण खरे समाधान आणि मनःशांती अध्यात्मातूनच  प्राप्त होते. सर्व प्राचीन भारतीय शास्त्र म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेल संगम आहे. विज्ञानाला मर्यादा आहेत आणि जेथे विज्ञान संपते तेथूनच हे अमर्याद अध्यात्म चालू होते. मानवी जीवनाला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी केवळ विज्ञान अपूर्ण आहे पण विज्ञान व अध्यात्मयुक्त शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र-ज्योतीषशास्त्र मानवीजीवनाला पूर्णत्व नक्कीच प्राप्त करून देतात.

परंतु जर का कोणी आमच्या वेद-गीता व ईश्वर संकल्पनेला आव्हान देत असेल. खुळचटपणा अथवा अंधश्रद्धा संबोधित असेल तर 120 कोटी पैकी 100 कोटीपेक्षा अधिक जनता नक्कीच तथाकथित विज्ञाननिष्ठांच्या पाठीमागे लपलेल्या हिंदूधर्म द्वेष्टयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

दुसरीकडे या न्यायालयीन विजयांमुळे आमची जबाबदारी वाढली आहे. या शास्त्रांना अधिक प्रगल्भ, प्रभावी व समयसूचक करणे तसेच वाईट अप्‌प्रवृत्तींचा निपाःत करण्याची जबाबदारी नव्हे तर कर्तव्यच आहे आणि ते आम्ही निश्चित पार पाडू.

डॉ. रविराज अहिरराव

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *