Cart

No products in the cart.

प्रवासी भारतीय दिवस, जयपूर जानेवारी 2012

जयपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या “प्रवासी भारतीय दिवस’ (दि. 7 जानेवारी ते दि. 9 जानेवारी 2012) हया “प्रवासी भारतीय कार्य मंत्रालय’ द्वारा आयोेजित संमेलनात वास्तुरविराज हया जगातील सर्वोत्कृष्ट वास्तुशास्त्र प्रशिक्षण संस्थेने आपली मुहूर्तमेढ अतिशय दिमाखात रोवली.

“वास्तुरविराज’ तर्फे प्रथमच हया अनोख्या संमेलनातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात  भाग घेण्यात आला होता. हया अनोख्या संकल्पनेचे हे 10 वे वर्ष होते.  प्रवासी भारतीय दिवस या संमेलनाची सुरवात दि. 7 जानेवारी 2012 रोजी सकाळी ठीक 10 वा. जयपूर शहरातील बिर्ला सभागृहात अत्यंत शिस्तबध्द वातावरणात झाली. दि. 7 जानेवारी 2012 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय विदेश मंत्री श्री. वायलर रवि हयांनी केलेल्या औपचारिक घोषणेनुसार जयपूरच्या गुलाबी थंडीच्या वातावरणात संमेलनाचे उद्‌घाटन दि. 8जानेवारी 2012 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. याप्रसंगी त्रिनिदाद व टोबॅगोच्या पंतप्रधान श्रीमती कमलाप्रसाद बिस्सेसार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना श्री. वायलर रवि  म्हणाले की, राजस्थान हे राज्य हया संपूर्ण संमेलनाचे सहयोगी राज्य असेल व त्या दृष्टीने हया संमेलनास राज्याची विविधतेने नटलेली संस्कृती आणि राज्याच्या विविध क्षमता बारकाईने समजून घेण्यास  निश्चितच फायदेशीर ठरेल.

“वास्तुरविराज’ संस्थतर्फे ह्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एका प्रदर्शनात भाग घेण्यात आला.”वास्तुरविराज’ संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. रविराज अहिरराव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंजुश्री अहिरराव तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संदिप नाशिककर यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून ह्या संमेलनास हजर होते. त्यांनी प्रदर्शनातील संस्थेच्या स्टॉलवर दि. 7 ते 9 जाने. 2012 दररोज उपस्थित राहून विविध देशी तसेच विदेशी पाहुण्यांसमवेत चर्चा तसेच विचारविनिमय करून “वास्तुरविराज’ ह्या संस्थेचा कारभार संपूर्ण जगात पसरविण्यावर भर दिला. त्यांच्या उपस्थितचा मुख्य भर हा वास्तुरविराज संस्थेचे संपूर्ण जगभर वितरक नेमण्यावर होता.

अशाप्रकारे सुरू झालेल्या या संमेलनाच्या संपूर्ण परिसराला जणू काही छावणीचे रूपच प्राप्त झाले होते. याला कारण तेथे असलेली राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्ती, मंत्री, व्यासायिक, अनिवासी भारतीय तसेच अतिमहत्वाच्या व्यकतीची असलेली वर्दळ. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकंाच्या गराड्यातून सर्वांनाच सुरक्षेचे सारे सोपस्कार पार पाडल्यानंतरच सभागृहात प्रवेश मिळत होता.

संपूर्ण परिसर अतिशय देखणा होता व सभागृहासमोरील छोटेखानी तलाव तसेच उत्स्फूर्त कारंजी एखाद्या राजवाड्या सदृश बिर्ला सभागृहाच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होती. सभागृहाच्या परिसरातच उंची मंडप व शामियाने उभारण्यात आले होते. तेथेच अनेकविध उंची पुरातन वस्तु व शिल्पे, गालिचे, सतरंज्या व अनेक शोभेच्या वस्तुंचे बरेचसे शोभामंडप होते. त्यामुळे संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खरेदीची जणू काही पर्वणीच होती.

जगभरातुन सुमाने 1500 हूनही जास्त निमंत्रितांनी ह्या अभूतपूर्व संमेलनास हजेरी लावली होती. ह्या संमेलनाचे राष्ट्रीय दूरचित्र वाहिनी “दूरदर्शन’ वर तसेच संमेलनाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण दि. 8 रोजी सकाळी 8 वा. पासूनच दाखविण्यात येत होते. ह्या प्रदर्शनात एकुण 130 विविध संस्थांनी भाग घेतला होता. ह्या विविध बॅंका, वित्तिय संस्था, आयुर्विमा संस्था, विविध राज्यांची पर्यटन खाती, जयपूरच्या स्थानिक बाजारपेठेतील शोभेच्या वस्तू, भरजरी कपडे, हॉलिडे रीसॉर्ट, पुस्तके इ. चा समावेश होता.

ह्या सन्मानीय सोहळ्यास राजस्थान, गुजरात, केरळ तसेच झारखंड ह्या राज्यांचे मुख्यमंत्री जातीने हजर होते. अशा या अनोख्या आंतरराष्ट्रीय संमेलनात महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्यातून आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतुन केवळ वास्तुरविराज ही एकमेव संस्थाच सहभागी झाली. याची खंत वास्तुरविराजचे सर्वेसर्वा डॉ. रविराज अहिरराव यांनी व्यक्त केली.

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *